पुणे : कोथरूड परिसरातील एका नगरसेविकेच्या अल्पवयीन पुतण्यासह दोघा जणांना बेकायदा हत्यार बाळगल्याप्रकरणी कोथरूड पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या दोघांकडून कुकरी आणि काही चाव्या जप्त करण्यात आल्या आहेत. हर्षल दिलीप ढोकळे (वय १९, रा. जयभवानीनगर, कोथरूड) याच्यासह नगरसेविकेच्या १७ वर्षीय पुतण्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस शिपाई राकेश अशोक टेकावडे (वय ३१) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ढोकळे आणि त्याचा एक साथीदार पौड रस्त्यावर असलेल्या महाराजा कॉम्प्लेक्सच्या मागील बाजूच्या बोळामध्ये अंधारात संशयास्पदरीत्या बसल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार, कोथरूड पोलिसांनी धाव घेतली. या दोघांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यांची अंगझडती घेतली असता ढोकळे याच्याकडे चार चाव्या मिळून आल्या. (प्रतिनिधी)
नगरसेविकेच्या पुतण्यासह दोघांना हत्यारासह अटक
By admin | Published: March 30, 2017 2:58 AM