पिंपरी : गांधीनगर झोपडपट्टी, बोपोडी येथील उर्वरित अतिक्रमण कारवाईसाठी गेलेल्या पुणे महापालिकेच्या अतिक्रमणविरोधी पथकावर रहिवाशांनी दगडफेक केली. यामुळे वाहनाच्या काचा फुटून नुकसान झाले. या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे. हॅरिस पुलाशेजारील गांधीनगर झोपडपट्टीत २ महिन्यांपूर्वी अतिक्रमणविरोधी कारवाई महापालिकेतर्फे करण्यात आली होती. यातील ३ ते ४ अतिक्रमणांवर कारवाई शिल्लक होती. त्यावर कारवाई करण्यासाठी सोमवारी सकाळी अतिक्रमणविरोधी पथक दोन वाहनांसह येथे दाखल झाले होते. दरम्यान, आम्हाला नोटीस मिळाली नाही, असे सांगत स्थानिक नागरिकांनी कारवाईला विरोध केला. कर्मचारी आणि नागरिकांमध्ये वाद सुरू असताना जमावाने पथकाच्या वाहनावर दगडफेक सुरू केली. त्यात वाहनाच्या काचा फुटून नुकसान झाले. यामुळे परिसरात काही काळ तणाव निर्माण झाला होता.(प्रतिनिधी)
दगडफेकप्रकरणी बोपोडीत दोघांना अटक
By admin | Published: April 22, 2015 5:38 AM