चाकण : खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील महात्मा फुले मार्केट यार्डमध्ये जुना व नवीन अशा दोन्ही कांद्यांची आवक झाल्याने आवकेत दुपटीने वाढ झाली आहे. त्यामुळे कांद्याचे भाव मोठ्या प्रमाणावर गडगडले आहेत. घाऊक बाजारात कांद्याला सरासरी ३ रुपयांपासून ७ रुपयांपर्यंत भाव मिळत असल्याने शेतकरीवर्गात चिंतेचे वातावरण पसरले आहे.मागील वर्षी याच हंगामात जुन्या साठविलेल्या कांद्याला ३५ रुपये प्रतिकिलोस भाव होता, त्यामुळे याही वर्षी भाव वाढेल, या आशेने शेतकऱ्यांनी कांदा साठविला होता, पण भाव गडगडल्याने शेतकºयांची निराशा झाली असून, उत्पादन खर्चही निघत नाही. त्यामुळे शेतकरी अक्षरश: हवालदिल झाले असून कांदाउत्पादनासाठी काढलेले कर्ज कसे फेडायचे, असा प्रश्न शेतकºयांना पडला आहे. यामुळे शेतकºयांवर कांदे फुकट वाटण्याची वेळ आली आहे. चाकण बाजारात काल प्रतिक्विंटल ३०० ते ७०० रुपये भाव मिळाल्याने शेतकरी चिंतेत आहे; मात्र बाजार समिती कांद्याला कमीत कमी ३०० व जास्तीत जास्त १००० रुपये प्रतिक्विंटल भाव मिळाल्याचे सांगत आहे.वखारीतील कांदा सडतोयअनेक शेतकºयांनी मागील वर्षी साठविलेला जुना कांदा चांगल्या हवामानामुळे टिकून राहिला असला, तरी आता तो सडण्याच्या मार्गावर आहे. मागील वर्षी या हंगामात चांगला भाव मिळाल्याने शेतकºयांमध्ये समाधान होते; परंतु बाजारात मोठी घसरण झाल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. जुन्या कांद्यावरील आवरण काळे पडू लागल्याने प्रतवारी करताना निम्म्याहून अधिक कांदे फेकून द्यावे लागत आहेत. जुन्या कांद्याला अतिशय कमी म्हणजे, अगदी १ रुपयापासून सहा रुपयांपर्यंत तर, नवीन कांद्याला ४ ते ७ रुपयांपर्यंत भाव मिळत आहे.हमीभाव देण्याची मागणीकांदा उत्पादन करताना मशागत, लागवड, खुरपणी, पाणी, खते, औषधे, फवारणी, काढणी, मजुरी, पॅकिंग, वाहतूक, वीजबिल असा एकरी ३५ ते ४५ हजार रुपये खर्च येतो व आजच्या बाजारभावानुसार कांद्याचे १५ ते २० हजार रुपये उत्पन्न मिळत आहे. त्यामुळे शेतकºयाला एकरी २० ते २५ हजार रुपये तोटा सहन करावा लागत आहे. त्यामुळे शेतकºयाला खासगी सावकार, सोसायट्या, बँकांकडून घेतलेले कर्ज परतफेड करता येत नाही. त्यामुळे सरकारने शेतकºयांना कृषी वीजबिले माफ करून शेतीसाठी मोफत वीज द्यावी, व शेतमालाला हमीभाव द्यावा, अशी मागणी शेतकरीवर्गाकडून होत आहे.शेतकºयांकडे असणारा कांद्याचा जुना साठा व नवीन काढलेला कांदा एकाचवेळी बाजारात आल्याने आवक वाढली. त्याचा भावावर परिणाम झाला आहे. साठवलेला जुना कांदा संपला की कांद्याला चांगला भाव मिळू शकतो.- चंद्रकांत इंगवले, सभापती खेड बाजार समितीपाकिस्तान व अफगाणिस्तान मधून मोठ्या प्रमाणावर कांदा कर्नाटकमध्ये आयात झाला असून, कांद्याचा मोठा साठा झाला आहे. त्यातच कांद्याची निर्यात बंद असल्याने भाव गडगडले आहेत. शेतकºयांच्या हितासाठी कांदा निर्यात सुरू करावी.- तुकाराम बोत्रे, शेतकरी, खालुंब्रेनव्याने बाजारात येणारा पंचगंगा कांदा टिकत नसल्याने त्याची बाजारात आवक वाढली आहे. तुलनेने मागणी कमी व बाजारात कांद्याचा पुरवठा जास्त झाल्याने त्याचा बाजारभावावर परिणाम झाला आहे.- माणिक गोरे ( कांदा व्यापारी, आडतदार, चाकण मार्केट यार्ड )
नीचांकी भावाने चाकण बाजारात कांदा मातीमोल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2018 2:39 AM