निरवांगी : उन्हाची तीव्रता मोठ्या प्रमाणात वाढत आहे. शेतातील विहिरींच्या पाण्याने तळ गाठला आहे. उसाचे पीक वाचविण्यासाठी निमसाखर (ता. इंदापूर) येथील शेतकऱ्यांचा मोठ्या प्रमाणात विंधन विहिरी घेण्याकडे कल दिसून येत आहे. पाटबंधारे खात्याच्या पाण्यावर अवलंबून असणाऱ्या परिसरातील शेतीपिके जळून जाण्याच्या मार्गावर आहेत. या परिसरातील विहिरींचे पाणी संपलेले असल्याने कालव्यावरील शेतकऱ्यांचा विंधन विहिरी घेण्याकडे कल दिसून येत आहे. निमसाखर, कंळब या रस्त्याने मोठ्या प्रमाणात विहिरी शेतकरी पोकलेनच्या साह्याने खोदण्याचे काम करीत आहेत; परंतु पाण्याची पातळी मोठ्या प्रमाणात खाली गेल्याने हजारो रुपये खर्च करूनही पाणी लागत नाही. > नियोजनाअभावी अकोलेत पाणीटंचाईअकोले : परिसरात दिवसेंदिवस पाणीटंचाई जोर धरत आहे. नागरिकांना दिलासा देण्यासाठी प्रशासनाने टँकर सुरू केले आहेत. मात्र, पाण्याचा साठा आणि टँकर भरण्यासाठी दिलेल्या वेळेचे नियोजन नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे पाण्याच्या खेपा टाकण्यात टँकर वाहतूकदारांना अडचण निर्माण होत आहे.अकोले परिसरात गावठाण, दराडेवस्ती, गायकवाडवस्ती, वायसेवाडी, धायगुडे या ठिकाणी दररोज ८ खेपा टाकण्याच्या प्रशासनाच्या सूचना आहेत. मात्र, पुरेशा खेपा मिळत नसल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. याबाबत सरपंच सुनीता वणवे म्हणाल्या, ‘‘प्रशासनाने दोन टँकर मंजूर केले आहेत. वायसेवाडी, धायगुडेवाडी परिसरात पाण्याच्या खेपा ठरल्याप्रमाणे मिळत आहेत. मात्र, गावातील वस्ती परिसरात टँकरचे नियोजन कोलमडले आहे. खेपा मिळण्यात अडचण येत आहेत.याबाबत गटविकास अधिकारी अनिकेत पाटील यांनी सांगितले, की विजेची कमतरता असल्याने तसेच पाणी भरण्यासाठी दिलेल्या वेळेत टँकर न पोहोचल्यास खेप टाकण्यात अडचण येत आहे; मात्र काही कारणास्तव पाणी मिळण्यास अडचण निर्माण झाल्यास संबंधितांनी सूचना करावी. त्यानंतर टँकर पूर्ववत करण्यात येईल.
विहिरींनी गाठला तळ
By admin | Published: May 10, 2016 12:48 AM