शहरं
Join us  
Trending Stories
1
Explainer : पश्चिम महाराष्ट्रात शरद पवारांच्या सभा गाजल्या; मात्र गर्दीचं रुपांतर मतांमध्ये होणार का?
2
“एक हैं तो सेफ हैं, राहुल गांधी फेक हैं, तेव्हा अदानी कोणाचे होते?”; विनोद तावडेंचा पलटवार
3
“२३ तारखेनंतर कोणावर दया नाही, फडणवीस-शिंदेंना पोलिसांत हेटपाटे मारावे लागतील”: संजय राऊत
4
शरद पवारांना मी आमदार केलं असं म्हणणार नाही, कारण त्यावेळी मी तिसरीत होतो: अजित पवार
5
महाराष्ट्रात मविआ सरकार आल्यास आरक्षणात मुस्लीम कोटा देण्यावर चर्चा; रेवंथ रेड्डींची गॅरंटी
6
मुख्यमंत्री नितीश कुमार एकुलता एक मुलगा निशांतला लाँच करण्याच्या तयारीत? चर्चांना उधाण
7
शर्वरी जोग नव्या मालिकेत झळकणार, अभिनेत्रीच्या खऱ्या आयुष्यातील 'मितवा' कोण माहितीये का?
8
जेठालालचंही मालिकेच्या निर्मात्याशी भांडण? थेट कॉलरच पकडली; नक्की प्रकरण काय वाचा
9
याला म्हणतात रिटर्न...! ₹2 चा शेअर ₹120 वर पोहोचला; 5 वर्षांत 5500% चा तुफान परतावा दिला; केलं मालामाल
10
RCB ची खतरनाक चाल! 'मुंबई'ला गतवैभव मिळवून देणाऱ्या चेहऱ्यावर खेळला मोठा डाव
11
फक्त या ४ गोष्टी वर्ज्य करून गायकानं घटवलं १३० किलो वजन, ट्रान्सफॉर्मेशन पाहून व्हाल हैराण
12
कोण आहेत अयातुल्लाह अली खामेनेई यांचे पुत्र मोजतबा? जे होऊ शकतात इराणचे पुढील सर्वोच्च नेते
13
दिल्लीमध्ये पुन्हा शेतकरी आंदोलन पेटणार, हजारो ट्रॅक्टर कूच करणार, उपोषणाचीही घोषणा
14
ना बाबा रामदेव, ना आचार्य बालकृष्ण? कोण आहे ₹67535 कोटींच्या पतंजलीचा खरा मालक? योगगुरूंनीच सांगितलं...
15
बुलढाण्यात शिवसेना उमेदवाराला पाठिंबा दिल्याचं पत्र खोटं; राष्ट्रवादी काँग्रेसनं दिलं स्पष्टीकरण
16
यशाच्या शिखरावर असताना लग्न का केलं? माधुरी दीक्षित म्हणाली, "मी माझं स्वप्न..."
17
रूकेगा नहीं... इस्रायलचे लेबनानवर हल्ले सुरूच, हिज्बुल्लाच्या मुख्य प्रवक्त्याचा केला खात्मा
18
175 किमीची रेंज देणारी 'ही' इलेक्ट्रिक बाईक, किंमत 90 हजारांपेक्षा कमी
19
Numerology: ‘या’ ५ मूलांकांवर दत्तकृपा; गुरुपुष्यामृत योगावर अपार लाभ, लक्ष्मी शुभच करेल!
20
Vastu Tips: आजारमुक्त वास्तु ठेवण्यासाठी फॉलो करा 'या' सोप्या वास्तुटिप्स!

घटस्फोटालाही उरली नाहीत सीमेची बंधने; परदेशातूनही दाम्पत्य विभक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2018 2:04 AM

न्यायालयीन कामकाज होतेय अद्ययावत

पुणे : शिक्षण आणि भोवतालच्या परिस्थितीमुळे लग्नाबाबत समाजाची असलेली मानसिकता बदललेली दिसते. त्यामुळे लग्नाच्या बंधाला सीमांचा अडथळा राहिलेला नाही. सध्याची पिढी तर जात-धर्माच्या देखील पल्याड गेली आहे. त्यामुळे राज्य, देश आणि अगदी दुसऱ्या खंडातील व्यक्तीबरोबर लग्न केल्याची अनेक उदाहरणे आहेत. मात्र दुर्दैव असे की, लग्नाप्रमाणे आता घटस्फोटालाही सीमेची बंधने उरलेली दिसत नाही.राज्यच काय तर आता देश- विदेशातील जोपडेदेखील व्हिडीओ कॉन्फरंसद्वारे (व्हिसी) घटस्फोट घेत असल्याचे प्रकार वाढत आहेत. पुण्यातील पती आणि पोलंडमधील पत्नी असलेल्या दाम्पत्याने नुकताच न्यायालयीन प्रक्रिया पार करून व्हिसीद्वारे काही क्षणात घटस्फोट घेतल्याचा खटला नुकताच निकाली निघाला.या सर्वांत अद्ययावत यंत्रणा महत्त्वाची भूमिका बजावत आहे. त्यामुळे घटस्फोटसाठी पुर्वीसारखी किचकट प्रक्रिया राहिली नसल्याचे यातून स्पष्ट होते. यामुळे जरा बिनसले की घटस्फोट घेवू, अशी मानसिकताच निर्माण झाली आहे.घटस्फोट घ्यायचा म्हटले की काही वर्षांपूर्वी अनेक प्रक्रिया पुर्ण कराव्या लागत. त्यात दोघेही तारखांना हजर राहणे गरजेचे असायचे. मात्र दोघांपैकी एखादा व्यक्ती काही कारणास्तव उपस्थित राहू शकला नाही किंवा तो कामानिमित्त परदेशात असेल तर खटला पुढे ढकलला जात. तसेच पती किंवा पत्नी परदेशातील असेल तर तिला किंवा त्याला दावा दाखल केलेल्या ठिकाणी प्रत्यक्ष हजर राहणे आवश्यक असायचे. आता मात्र चित्र बदलले आहे. दोन्हीपैकी एक व्यक्ती जर न्यायालयात असेल तर व्हीसीद्वारे संवाद साधून देखील त्यांना घटस्फोट मिळत आहे.पती पत्नीची उलटतपासणी घेणे, फौजदारीप्रकरणात साक्षीदार किंवा फिर्यादी यांना म्हणणे मांडण्याची संधी देणे, अशी विविध कामे सध्या व्हिसींद्वारे होत आहे. शासनाने कौटुंबिक न्यायालयासाठी एक व्हिडीओ अ‍ॅप विकसित केले आहे. या अ‍ॅपवरून देशात अथवापरदेशात कोठेही असलेल्या व्यक्तीशी मोबाइलवरून न्यायाधीशांशी संवाद साधता येणार आहे.विशेष म्हणजे स्काईपद्वारे सुनावणीच्या वेळी परदेशात असलेल्या व्यक्तीला तेथील न्यायालयात जावे लागते. त्यावेळी काही अडचणी येण्याची शक्यता असते. मात्र, या अ‍ॅपवरून घरात बसून अथवा ती व्यक्ती जिथे असले तेथून कौटुंबिक न्यायालयातील समुपदेशक, न्यायाधीशांशी संवाद करू शकणार आहे.वेळ आणि पैशांची होतेय बचततारखेला हजर राहिल्याशिवाय पुर्वी पुढील सुनावणी होत नसे. दावा दिल्लात दाखल असेल आणि पती किंवा पत्नी कामानिमित्त केरळला असेल तर त्याला पुन्हा दिल्लीला जावे लागत. त्यासाठी मोठ्या प्रमाणात वेळ आणि खर्च वाया जात. तर परदेशातून तारखेला हजर राहणे लाखोंच्या घरात जात. मात्र आता व्हिसीद्वारे सुनावणी होत असल्याने वेळ आणि पैशाची बचत होत आहे.

टॅग्स :Divorceघटस्फोटrelationshipरिलेशनशिप