संत तुकारामनगर येथे महिला बचत गटातील महिलांसोबत कटके यांनी संवाद साधला. या वेळी ते बोलत होते. ते म्हणाले की, पंचायत समिती आणि एचडीएफसी बॅंक यांच्या समन्वयातून महिला बचत गटातील महिलांना ६० पैसे दराने कर्जवाटप करण्यात येणार आहे. त्यामुळे उद्योग उभारणीत याचा मोठा लाभ भगिनींना होणार आहे. बचत गटातील प्रत्येक महिलेला आणि तिच्या कुटुंबाला कोरोना प्रतिबंधक लसीकरण करण्यात येईल.
या वेळी पं. स. हवेली क्लस्टर मॅनेजर पंकज परनकर, एचडीएफसी रिलेशनशिप मॅनेजर अनिल पाटील आणि महेश साळविठ्ठल, महिला बचत गट कार्यालयीन अधिकारी स्वाती दरंदले, कामिनी चव्हाण, नेहा देडगे, अक्षय शेडगे, अनिकेत साळुंखे यांच्यासह मोठ्या प्रमाणावर महिला उपस्थित होत्या.
वाघोली परिसरातील महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी शिवसेना, तसेच जि. प. सदस्य ज्ञानेश्वर कटके यांच्या मध्यमातून प्रयत्न केले जात आहे. आमच्या मध्यमातून सुरू असलेल्या या उपक्रमांचा भक्कम आधार महिला भगिनींना वाटतो. याचे आयोजक म्हणून आम्हाला समाधान आहे.
- प्रिया कुसाळकर, बचत गट अध्यक्षा, संघटिका, वाघोली