पार पडली.
खोरवडी येथील दत्तात्रय जठार व इतर शेतकऱ्यांनी सेंद्रिय उसापासून सेलिब्रेटिंग फार्मर्स एज यांचे साहाय्याने ऊस प्रक्रिया करुन गन्ना चुस्की, गन्ना गोळा, गन्ना कॉफी, गन्ना चॉकलेट, गन्ना जिलेबी, गन्ना इमली चटणी या पदार्थांचे उत्पादन सुरू केले आहे. या पदार्थांची जाहिरात व विक्रीची सुरुवात तालुका कृषि अधिकारी जयश्री कदम यांच्या हस्ते झाली.
या प्रसंगी कदम यांनी विकेल ते पिकेल अभियानाविषयी मार्गदर्शन केले.
एस. आर. पी. गट क्र. ५ चे समादेशक तानाजी चिखले यांनी शहरांमधील मॉल्स, आईस्क्रीम पार्लर्स, कॉफी शॉप्स, हॉटेल्स यांमध्ये विक्री व्यवस्था करणेविषयी मार्गदर्शन केले. कृषि सहायक संतोष मोरे यांनी, ऊस उत्पादकांनी जास्तीचा भाव मिळण्यासाठी ऊसप्रक्रियायुक्त पदार्थ तयार केले ही बाब प्रशंसनीय असून, या उद्योगांची वाढ, विस्तारीकरण, बळकटीकरण, ब्रँडिंग व मार्केटिंग बचत गट व शेतकरी उत्पादक कंपनीमार्फत करण्याचे नियोजित असल्याचे सांगितले. दत्तात्रय जठार यांनी गन्ना चुस्की व इतर पदार्थ तयार करण्याची प्रक्रिया सांगितली. विविध बचत गटांचे सदस्यांकडे हे पदार्थ तयार करण्याची सुविधा निर्माण करण्याचे प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. तसेच या प्रक्रियेमध्ये शेतकऱ्यांना १०००० रु. प्रतिटन भाव मिळू शकतो असे सांगितले. याप्रसंगी मंडळ कृषि अधिकारी महेंद्र जगताप, कृषि पर्यवक्षक प्रभाकर बोरावडे, राजेंद्र जगदाळे, किसन काझडे, सरकारी वकील अनंत आडसकर, बाळासाहेब जठार, शिवराम जठार, गोरख धुमाळ, अमोल जठार, गणेश जठार, तेजस जठार, भाऊसाहेब धुमाळ, संतोष कदम, आबासाहेब दरेकर, रोहित जठार यांच्यासह आलेगाव, कदमवस्ती व खोरवडी परिसरातील शेतकरी बचत गटांचे सदस्य बहुसंख्येने उपस्थित होते. समीर काळे यांनी आभार मानले.