शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
2
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
3
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
4
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
5
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
6
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
7
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात
8
पश्चिम रेल्वेवर वाढणार एसी लोकलच्या १३ फेऱ्या; वातानुकूलित फेऱ्यांची संख्या ९६ वरून १०९
9
इन्फ्लुएंझामुळे मुंबईकर ‘आजारी’, राज्यात ५७ रुग्णांचा मृत्यू; काय आहेत लक्षणे?
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

पर्यावरणसंवर्धनासाठी ‘ब्राऊनलिफ’ चळवळ, नव्या वर्षाचा नवा संकल्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 01, 2018 5:25 AM

झाडाचे पान गळून पडले की, त्याचा काही उपयोग नसतो, असा गैरसमज अनेकांमध्ये आहे. परंतु हे गळालेले पानदेखील खूप मोलाचे आहे. ते पर्यावरणासाठी उपयुक्त ठरू शकते. पानगळती झाली, की अनेक ठिकाणी कचरा समजून त्याला जाळण्यात येते.

- श्रीकिशन काळेपुणे : झाडाचे पान गळून पडले की, त्याचा काही उपयोग नसतो, असा गैरसमज अनेकांमध्ये आहे. परंतु हे गळालेले पानदेखील खूप मोलाचे आहे. ते पर्यावरणासाठी उपयुक्त ठरू शकते. पानगळती झाली, की अनेक ठिकाणी कचरा समजून त्याला जाळण्यात येते. परंतु, जाळल्यानंतर उलट त्याचा धूर आरोग्यास धोकादायक ठरतो. ही पाने कोणीही जाळू नये, तर त्याचे जतन करावे. हाच नवीन वर्षाचा संकल्प ‘ब्राऊनलिफ’ या संस्थेच्या कार्यकर्त्यांनी केला आहे. या चळवळीत नागरिकांनीही सहभागी होऊन पर्यावरण जपण्याचा ध्यास घेतला पाहिजे. ही चळवळ पर्यावरणासाठी नक्कीच लाभदायक ठरणारी आहे. दरवर्षी सुमारे नोव्हेंबर ते मार्च महिन्यात पानगळती होत असते. त्यामुळे परिसरात प्रचंड ‘ब्राऊनलिफ’ पडलेले असतात. हा कचरा समजून सफाई कर्मचारी एकत्र करून ते जाळून टाकतात. त्यामुळे पर्यावरणाचीच हानी होत असल्याचे त्यांच्या लक्षात येत नाही. ही गळती झालेली पानेदेखील निसर्गासाठी उपयुक्त असतात. त्यामुळे ती जाळू नयेत, यासाठी पर्यावरणप्रेमी अदिती देवधर यांनी ‘ब्राऊनलिफ’ ही चळवळ सुरू केली आहे.दोन वर्षांपूर्वी त्यांनी ही संस्था सुरू केली. त्याद्वारे ‘ब्राऊनलिफ’साठी कार्य सुरू केले. या ‘ब्राऊनलिफ’ संकेतस्थळावर त्यांनी या चळवळीबद्दल संपूर्ण माहिती दिली आहे. देशात एकही ‘ब्राऊन’ पान जाळले जाऊ नये, हा त्यांचा संकल्प आहे. त्यासाठी त्यांनी एक व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप तयार केला आहे. त्यामध्ये त्यांनी या चळवळीसाठी कार्य करणाºयांचा समावेश केला आहे. प्रत्येक जण आपापल्या भागात याबाबत जनजागृती करीत आहेत.झाडावरून गळून पडलेल्या पानांमध्ये ५० ते ७० टक्के पोषक द्रव्य असते. ते जमिनीसाठी अत्यंत उपयुक्त असतात. या पानांमुळे मातीमधील ओलावा टिकून ठेवला जातो. या पानांमुळे बाष्पीकरण कमी होते. त्यामुळे ही पाने झाडांच्याभोवती टाकली पाहिजेत.पाने जाळणे धोकादायककोरडी पाने जाळण्यावर अनेक देशांमध्ये बंदी घालण्यात आली आहे. कारण हा वायूप्रदूषणाचा एक भाग आहे. त्यामुळे पर्यावरण व नागरिकांचे आरोग्य धोक्यात येते. या धुरामध्ये अनेक विषारी कण आणि वायू तयार होत असतात. परिणामी अशी पाने जाऊ नये, यासाठी ही ‘ब्राऊनलिफ’ची चळवळ सुरू करण्यात आली आहे. कोरडे पाने जाळल्यानंतर खोकला, छातीत दुखणे, धाप लागणे, दीर्घकालीन श्वसनाची समस्या निर्माण होणे आदी त्रास नागरिकांना होऊ शकतो. दमा किंवा इतर श्वसनाच्या विकाराने ग्रस्त असलेल्यांसाठी तर ही पाने जाळणे अत्यंत धोकादायक आहे.या पानांचे करायचे काय?सध्या दररोज पानगळती झाल्यानंतर जमिनीवर कोरडी पाने पडलेली असतात. या पानांचे करायचे काय ? असा प्रश्न अनेकांना पडतो, तर त्यावर ‘ब्राऊन लिफ’ने तीन उपाय सुचविले आहेत.पहिला :तुमच्या सोसायटीमध्ये किंवा एखाद्या मोकळ्या जागी ही पाने एकत्र करून ठेवा.दुसरा : पाने एकत्र करून त्यापासून कंपोस्ट तयार करता येते.तिसरा : ‘ब्राऊनलिफ’ ही संस्था एकत्र केलेली पाने ज्यांना गरज आहे, त्यांना देते. त्यामुळे सोसायटीधारकांनी ही पाने एकत्र करून संस्थेला दान करावीत. 

टॅग्स :Puneपुणे