पुणे : शहरातील वाहतुकीला शिस्त लागावी, यासाठी शहर वाहतूक नियंत्रण शाखेने वाहतूक नियमांचा भंग करणाऱ्यांवर जोरदार कारवाईची मोहीम सुरू केली आहे़ त्यातच आता नव्या वर्षात हेल्मेटसक्तीची अंमलबजावणी करण्यात येणार असून, त्याची तयारी डिसेंबरमध्ये मोठ्या प्रमाणावर सुरू आहे़ गेल्या ११ महिन्यांत वाहतूक शाखेने वाहतूक नियमांचा भंग करणाºयांवर तब्बल १६ लाख ७३ हजार १० जणांवर कारवाई केली असून, त्यांच्याकडून ३७ कोटी ४४ हजार ७८ हजार ९०० रुपयांचा दंड वसूल केला आहे़पुणे शहरातील वाहतूक समस्या दिवसेंदिवस बिकट होऊ लागली आहे़ दररोज वाढणाºया वाहनांसाठी मूलभूत सुविधा नसल्याने दिवसेंदिवस वाहतूककोंडीत भर पडत जात असून, वाहनचालकांनी केलेल्या नियमभंगामुळे त्यात भर पडत आहे़ अशा वाहतुकीच्या विविध नियमांचे भंग करणाºया वाहनचालकांवर वाहतूक शाखेकडून नियमितपणे कारवाई केली जात असते़ त्याचबरोबर सध्या चौकाचौकांत लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेºयाच्या साहाय्याने सिग्नलच्या वेळी झेब्रा क्रॉसिंगवर उभ्या राहणाºया वाहनचालकांवर कारवाई करण्यात येत असते़पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयात पुणे शहरात साधारण ३८ लाख वाहनांची नोंद झाली आहे़ त्यात प्रामुख्याने २८ लाख दुचाकी आहेत़ त्यात पुणे शहराबरोबर काही तालुक्यांतील वाहनांचा समावेश आहे़ हे पाहता दर दोन पुणेकर वाहनचालकांमागे एका वाहनचालकावर गेल्या ११ महिन्यांत वाहतूक नियमभंग केल्याबद्दल कारवाईला सामोरे जावे लागले असल्याचे दिसून येते़डिसेंबर महिन्यात वाहतूक पोलिसांनी शहरातील शासकीय कार्यालये, महाविद्यालयांच्या परिसरात हेल्मेटसक्तीची अंमलबजावणी सुरू केली असून, ही कारवाई लक्षात घेता डिसेंबरअखेर आणखी काही हजार वाहनचालकांवर विनाहेल्मेटची कारवाई झालेली असणार आहे़सिग्नल न पाळणाºयांची संख्याही शहरात मोठ्या प्रमाणावर आहे़ पोलिसांना सापडलेल्या १४ हजार ८६३ वाहनचालकांवर कारवाई करून त्यांच्याकडून २ कोटी ९६ लाख १२ हजार ३०० रुपये दंड आकारण्यात आला आहे़ वेगाने वाहन चालवून इतरांना अपघाताचा धोका निर्माण केलेल्या वाहनचालकांवर रॅश ड्रायव्हिंगच्या केसेस दाखल केल्या जातात़ अशा ५ हजार ३७५ जणांवर कारवाई करून ५३ लाख ७५ हजार रुपयांचा दंड करण्यात आला आहे़सीसीटीव्हीवरून कारवाई : झेब्रा क्रॉसिंग जास्तसीसीटीव्हीमार्फत सर्वाधिक कारवाया ५ लाख ६६ हजार ८०४ वाहनांवर कारवाई केली असून, त्यांना १० कोटी ९३ लाख ६० हजार ८०० रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे़राँग साइडने येणाºया वाहनचालकांवरही सातत्याने कारवाईकेली जात असून, गेल्या११ महिन्यांत ५७ हजार८४५ वाहनचालकांकडून१ कोटी १५ लाख ६९हजार रुपये दंड वसूल केला गेला आहे़1जानेवारीपासून हेल्मेटसक्ती लागू केली जाणार असली तरी वर्षभर विनाहेल्मेट घालून वाहतूक नियमांचा भंग करणाºया वाहनचालकांवर कारवाई करण्यात येते़ अशा ३४ हजार ४९९ वाहनचालकांवर जानेवारी ते नोव्हेंबर दरम्यान कारवाई करण्यात आली असून, त्यांच्याकडून १ कोटी ९२ लाख ४९ हजार ५०० रुपये दंड वसूल करण्यात आला आहे़
दर दोन पुणेकर वाहनचालकांमागे एकाकडून वाहतूक नियमांचा भंग
By ऑनलाइन लोकमत | Published: December 25, 2018 2:14 AM