शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी, खर्गे, सुप्रिया सुळेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
2
ईव्हीएम, कर्मचाऱ्यांसाठी वापरलेल्या एसटी बसमध्ये सापडली 500 रुपयांची बंडले; कोणाची? 
3
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
4
AUS vs IND Day 1: बुमराहचा 'चौकार'! २ सत्र गाजवणारा ऑस्ट्रेलियन संघ दिवसाअखेर बॅकफूटवर
5
जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री? मविआचा फॉर्म्युला काय ठरला? काँग्रेस नेत्यांनी सगळेच सांगितले
6
समंथा रुथ प्रभू बनली सर्वात लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटी; करिना, दीपिकालाही टाकलं मागे
7
ए आर रहमान यांचं गिटारिस्टसोबत अफेअर? चर्चांवर लेकानेच केलं भाष्य; म्हणाला, "निराश झालो..."
8
५१ चौकार, २९७ धावांचा पाऊस... वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीरचा धुमधडाका, पण Ferrari थोडक्यात हुकली
9
घडामोडींना वेग! मनसे नेते बाळा नांदगावकरांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट; बैठकीत काय घडले?
10
शरद पवारांचा एक्झिट पोलचा आकडा काय? शेवटपर्यंत मतमोजणी केंद्र न सोडण्याचे आदेश
11
जिद्दीला सलाम! आई-बाबांचा मृत्यू; दोन्ही पायांनी दिव्यांग असूनही करतो डिलिव्हरी बॉयचं काम
12
माहिममध्ये मोठा खेळ झाला? भाजपच्या नेत्याचा निवडणुकीनंतर ठाकरे गटात प्रवेश 
13
दहा अंकी मोबाईल नंबर तरुणाला करणार करोडपती? साउथच्या सिनेमाने घातलाय 'गोंधळ'; वाचा नेमकं प्रकरण
14
कॅनडातील विमानतळांवर भारतीयांची अतिरिक्त तपासणी होणार नाही; या घोषणेनंतर ट्रुडो सरकारने निर्णय बदलला
15
Adani प्रकरणी SEBI ची पहिली प्रतिक्रिया; अमेरिकेच्या आरोपांवर केलं 'हे' वक्तव्य
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'नवरीचा पत्ता नाही आणि यांनी लग्नाची तयारी केली'; नारायण राणेंचा महाविकास आघाडीवर हल्लाबोल
17
'भाजप सरकार आल्यावर वीज अन् पाण्याची बिले भरावी लागतील', अरविंद केजरीवालांचे टीकास्त्र
18
IND vs AUS : 'जानी दुश्मन' ठरला एकदम 'सस्ता'; हर्षित राणाची पहिली विकेट एकदम झक्कास (VIDEO)
19
कॅनडा झालं सुतासारखं सरळ! आता म्हणे- निज्जर हत्याकांडात भारताचा कुठलाही समावेश नाही!
20
पंढरपूर, मंगळवेढ्यासह प्रमुख ३० गावे ठरवणार नवीन आमदार; तुतारी, इंजिन कुणाच्या विजयाचे गणित बिघडवणार?

भाकरी फिरली अन् जिल्हा परिषद सदस्यांमध्ये चुळबुळ वाढली; शरद पवार गटाकडे खेपा वाढल्या

By ऑनलाइन लोकमत | Published: June 07, 2024 11:52 AM

जिल्हा परिषदेच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या ४४ सदस्यापैंकी बहुतांश सदस्य अजित पवार गटात होते. मात्र, आता हेच सदस्य शरद पवार गटात येण्यासाठी चुळबुळ करू लागल्याचे दिसत आहे....

- दुर्गेश मोरे

पुणे : ज्येष्ठ नेते शरद पवार यांना मुरब्बी राजकारणी आणि भाकरी फिरवणारा नेता म्हणून ओळखले जाते. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्येही त्यांनी अशी काही भाकरी फिरवली की विरोधकांची दाणादाण झाली. विशेष म्हणजे पुणे जिल्हा कोणाचा, अशीही चर्चा सुरू होती. लोकसभेच्या निकालानंतर पुणे जिल्हा अजित पवार नव्हे तर शरद पवारांचाच असल्याचे सिद्ध झाले. या महत्त्वपूर्ण घडामोडीनंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पदाधिकाऱ्यांची चलबिचल वाढली आहे. जिल्हा परिषदेच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या ४४ सदस्यापैंकी बहुतांश सदस्य अजित पवार गटात होते. मात्र, आता हेच सदस्य शरद पवार गटात येण्यासाठी चुळबुळ करू लागल्याचे दिसत आहे.

पक्षात फूट, नवे चिन्ह, केवळ एकच आमदार साथीला अशा परिस्थितीतही राष्ट्रवादीपासून दुरावलेल्यांची पुन्हा नव्याने मोट बांधत काँग्रेससह घटकपक्षांच्या मतदीने शरद पवार यांनी महायुतीला नामोहरण केले. संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या बारामती लोकसभा मतदारसंघात सुप्रिया सुळे यांचा एक लाख ५८ हजार मतांनी विजय झाला. गेल्या निवडणुकीतील मताधिक्यात यावेळी वाढ झाल्याचे दिसले. त्यामुळे पूर्वी बारामती अजित पवारांची पॉवर असल्याचे जे बोलले जात होते ते आता बंद झाले आहे. विशेष म्हणजे याचा परिणाम स्थानिक स्वराज्य संस्थांमधील पदाधिकाऱ्यांवर झाला आहे. जिल्हा परिषदेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे ४४, काँग्रेस ७, शिवसेना १३ भाजप ७, अपक्ष १, रासप १, लो. क्रा.आ. १ असे ७५ सदस्य आहेत. शिवसेना आणि राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर अनेक सदस्य शिवसेनेच्या एकनाथ शिंदे गटात, तर राष्ट्रवादीतील अजित पवार गटात सहभागी झाले. काहींनी भाजपची कास धरली, तर भाजपमधील काहींनी शरद पवार गटाला साथ दिली.

लोकसभा निवडणुकीत जिल्ह्यातील शरद पवार गट कमकुवत जाणवत होता. जिल्हा परिषदेचे सदस्य कधी शरद पवारांकडे तर कधी अजित पवारांकडे ये-जा करत होते. दरम्यान, अजित पवार यांनी सदस्यांना स्पष्ट भूमिका घ्यायला लावली. त्यामुळे बहुतांश सदस्य अजित पवार गटात राहिले. दुसरीकडे शरद पवारांनी आपली भाकरी फिरवण्यास सुरुवात केली. त्याचा परिपाक म्हणजे सुप्रिया सुळेंचा विजय. या विजयामुळे जनतेची सहानुभूती शरद पवार गटाला असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे आगामी राजकीय समीकरणे पूर्णपणे बदलल्याने अनेक जिल्हा परिषद सदस्य आता शरद पवार गटात जाण्यास चुळबुळ करू लागले आहेत.

दौंडच्या राणी शेळके सुळेंच्या भेटीला

यवत येथील ग्रामदैवत श्री काळभैरवनाथ मंदिरात खासदार सुप्रिया सुळे यांच्या सत्काराचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला जिल्हा परिषदेच्या माजी महिला व बालकल्याण सभापती राणी शेळके यांनी उपस्थिती लावली. यामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या. कारण लोकसभा निवडणुकीत राणी शेळके यांनी अजित पवार गटाचे काम केले होते. निकालानंतर थेट खा. सुळेंच्या भेटीला आल्याने तालुक्यात उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे. दरम्यान राणी शेळके यांच्याशी ‘लोकमत’ने संवाद साधला असता त्या म्हणाल्या, मी पहिल्यापासून राष्ट्रवादीतच आहे. मात्र, आपण निवडणुकीत अजित पवार गटाचा प्रचार करत होता आणि आज इकडे, असा प्रश्न उपस्थित करताच शेळके थोड्या गडबडल्या. खा. सुळे यांचे अभिनंदन करण्यासाठी आले असल्याचे सांगत कार्यक्रमस्थळावरून शेळके यांनी काढता पाय घेतला.

जुन्यांचे पुनर्वसन की नव्यांना संधी

पक्षफुटीनंतर पत्रकारांशी बोलताना खा. सुप्रिया सुळे यांनी आमदारकीपासून ते सोसाटीपर्यंत सर्व निवडणुका लढवणार असल्याचे सुतोवाच केले होते. आता तर जनतेचे वारे शरद पवारांच्या बाजूने आहे. हे स्पष्ट झाल्याने शरद पवार गटात इनकमिंगचे वेटिंग वाढू लागले आहे. आगामी काळातील राजकारणात तारले जावे यासाठी ही धडपड सुरू असली तरी ज्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी सुरुवातीपासून ते नुकत्याच झालेल्या निवडणुकीतही शरद पवारांची साथ सोडली नाही, अशा जुन्यांचे येत्या काळात पुनर्वसन होणार की गटात येणाऱ्या नव्यांना संधी मिळणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मात्र, शरद पवार यावर काय भूमिका घेतात, हेही तितकेच महत्त्वाचे आहे.

टॅग्स :PuneपुणेZP Electionजिल्हा परिषदlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४Supriya Suleसुप्रिया सुळेAjit Pawarअजित पवार