शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
2
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
3
तोंडातून उसळे शब्दांचे हे बाण, वेडात प्रचारी वीर दौडले सात...
4
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
5
भारत-चीनमधील तणाव कमी होणे आवश्यक; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे मत
6
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
7
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
8
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
9
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
10
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी
11
मतांच्या ढिगाऱ्यात चंगू, मंगू बुडाले पाहिजे; मुख्यमंत्री शिंदे यांची राऊत बंधूंवर टीका
12
मुंबईत तब्बल आठ हजार किलो चांदीचे घबाड केले जप्त; निवडणूक आयोगाची कारवाई
13
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
14
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
15
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
16
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
17
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
18
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
19
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल

साखरदराच्या घसरणीला ब्रेक

By admin | Published: December 19, 2015 3:05 AM

अनेक महिन्यांपासून सुरू असलेल्या साखरेच्या घसरणीला अखेर ब्रेक लागला आहे. गेल्या १५ दिवसांत साखरेने क्विंटलमागे तब्बल २५० रुपयांची उसळी घेतली आहे. त्यामुळे कारखानदार

सोमेश्वरनगर : अनेक महिन्यांपासून सुरू असलेल्या साखरेच्या घसरणीला अखेर ब्रेक लागला आहे. गेल्या १५ दिवसांत साखरेने क्विंटलमागे तब्बल २५० रुपयांची उसळी घेतली आहे. त्यामुळे कारखानदार व ऊसउत्पादकांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. या साखर दरवाढीचा पहिली उचल देण्यासाठी चांगलाच हातभार लागेल. साखरेचे दर १५ दिवसांपासून सुधारण्यास सुरुवात झाली आहे. मात्र, राज्य बँकेने अजूनही साखरेच्या मूल्यांकनात वाढ केलेली नाही. राज्य बँकेने साखरदर वाढताच साखरेच्या मूल्यांकनात वाढ करण्याची गरज असल्याचे मत ऊसउत्पादक व्यक्त करीत आहेत. त्यामुळे पहिल्या उचलीच्या भिजत पडलेल्या घोंगड्याचा प्रश्न मार्गी लागेल. १ डिसेंबर रोजी राज्य बँकेने साखरेच्या मूल्यांकनात प्रतिक्विंटल ११५ रुपयांनी वाढ केली होती; त्यामुळे साखरेचे मूल्यांकन २,३८५ रुपयांवर गेले होते. मात्र, गेल्या १५ दिवसांत साखरेच्या दरात २५० ते ३०० रुपये प्रतिक्विंटल वाढ झाली आहे. मात्र, साखरेचे दर घटल्यानंतर बँक मागील ३ महिन्यांच्या सरासरीचा विचार न करता लगेचच मूल्यांकन कमी करते. मात्र, साखरदर वाढल्यानंतर बँक तिच्या सवडीने मूल्यांकन वाढविते. त्यासाठी ३ महिन्यांच्या साखरेच्या दराची नियामावली लावत नाही. काल सोमेश्वर कारखान्यावर साखरेच्या झालेल्या निविदेला साखरेला २,७१५ तर उच्च प्रतीच्या साखरेला २,८३० रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला आहे. एफआरपीसाठी कारखानदारांना दिलासा मिळणार१ डिसेंबरपूर्वी जिल्हा बँक कारखानदारांना एका क्विंटलला २,२७० रुपये मूल्यांकन देत होते. यामध्ये ११५ रुपयांची वाढ करण्यात आली होती. गेल्या वर्षीपेक्षा साखरेच्या मूल्यांकनाची परिस्थिती या वर्षी चांगली आहे. गेल्या वर्षी हंगामाच्या सुरुवातीलाच साखरेच्या मूल्यांकनात वारंवार कपात करण्यात आली होती. मात्र, या वर्षी ११५ रुपयांनी वाढ केल्याने ते २,३८५ रुपयांवर गेले होते.काल पुन्हा साखर २,८३० रुपये क्विंटलवर गेल्याने एफआरपी देण्यासाठी कारखानदारांना थोडाफार दिलासा मिळणार आहे. राज्य बँकेने या वाढलेल्या साखरेचे मूल्यांकन त्वरित वाढवावे, अशी मागणी ऊसउत्पादक करीत आहेत.८०:२०एफआरपी फॉर्म्युलायापूर्वीच मुख्यमंत्री देवंद्र फडणवीस यांनी ऊसउत्पादकांना ९० टक्क्यांपर्यंत उचल देण्यास सांगितले होेते. त्याप्रमाणे राज्य बँकेने जर सध्याचे साखरेचे दर पाहता, २,५०० ते २,५५० पर्यंत साखरेचे मूल्यांकन करण्यास काहीच हरकत नाही. त्यामुळे ऊसउत्पादकांना पहिली उचल १,८०० रुपये मिळणे शक्य होईल. एफाआरपी ८०:२० असा फॉर्म्युला ठरला आहे. त्यामुळे या फॉर्म्युल्यानुसार एफआरपीचा पहिला हप्ता ८० टक्क्यांप्रमाणे देण्यास कारखान्यांना फारसे अवघड जाणार नाही. गेल्या १५ दिवसांपूर्वी राज्य बँकेने साखरेच्या मूल्यांकनात ११५ रुपये वाढ केली होती़ ती आम्ही तातडीने कारखान्यांना दिली़ आता जर शासनाने व राज्य बँकेने पुन्हा आदेश दिले तर त्वरित अंमलबजावणी करू़- रमेश थोरात़, अध्यक्ष, जिल्हा मध्यवर्ती बँक़