शहरं
Join us  
Trending Stories
1
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
2
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
3
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
4
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
5
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
6
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
7
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
8
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
9
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर
10
‘आई’वर कुरघोडी करू पाहणाऱ्या ‘मावशी’चा राग; हिंदी सक्तीचा परस्पर GR काढला कुणी?
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

राष्ट्रवादीच्या शहराध्यक्षपदाला पुन्हा ब्रेक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2018 21:15 IST

पक्षाच्या विद्यमान शहराध्यक्ष खासदार वंदना चव्हाण यांनी दुसऱ्यांदा खासदार झाल्यानंतर लगेचच शहराध्यक्षपदावरून मुक्त करण्याची विनंती पक्षाला केली होती.

ठळक मुद्देपुणे शिल्लकच: सगळीकडची नावे जाहीरवंदना चव्हाण यांनी दुसऱ्यांदा खासदार झाल्यानंतर शहराध्यक्षपदावरून मुक्त करण्याची विनंती

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहराध्यक्षपदाचे नाव जाहीर होण्याचा पुन्हा एकदा ब्रेक बसला आहे. राज्यातील बहुतेक जिल्हाध्यक्ष व शहराध्यक्षांची नावे पक्षाने जाहीर केली असून पुणे शहराध्यक्षपदाचे नाव मात्र शिल्लक ठेवण्यात आले आहे. या पदासाठीची असलेली मोठी स्पर्धा आता कमी झाली असूनही नाव जाहीर न केल्यामुळे इच्छुकांमध्ये नाराजी निर्माण होत आहे.पक्षाच्या विद्यमान शहराध्यक्ष खासदार वंदना चव्हाण यांनी दुसऱ्यांदा खासदार झाल्यानंतर लगेचच शहराध्यक्षपदावरून मुक्त करण्याची विनंती पक्षाला केली होती. खासदारकीच्या कामाकडे जास्त लक्ष द्यायचे असल्यामुळे तसेच सलग दोन वेळा शहराध्यक्षपदावर काम पाहिल्यामुळे आता त्या पदावरून मुक्त करावे असे त्यांनी तत्कालीन प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे तसेच माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना कळवले होते. त्यादृष्टीने चर्चाही सुरू झाली. त्यात माजी महापौर प्रशांत जगताप, माजी उपमहापौर दीपक मानकर, माजी गटनेते सुभाष जगताप, विद्यमान उपाध्यक्ष अशोक राठी तसेच वैशाली बनकर व अन्य काही माजी महिला महापौरांनी या पदावर काम करण्याची इच्छा पक्षश्रेष्ठींकडे दर्शवली होती.अजित पवार यांनी या नावांची चर्चा ऐकून घेऊन १० जूनला आपण नाव जाहीर करू असे जाहीरपणे सांगितले होते. दरम्यानच्या काळात मानकर एका प्रकरणात अडकले गेल्यामुळे सर्वच चर्चा थांबली व आता तर राज्यातील अन्य जिल्हाध्यक्ष व शहराध्यक्षांची नावे जाहीर केल्यानंतरही पुण्याचे नाव बाकी ठेवण्यात आले आहे. सुभाष जगताप यांना मोहोळ विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवायची असल्याचे बोलले जात आहे. प्रशांत जगताप उपनगरातील हडपसर, वानवडी परिसरातील आहेत. त्यांना नुकतेच महापौरपद देण्यात आले. तसेच विद्यमान विरोधी पक्षनेते चेतन तुपे हेही त्याच परिसरातील आहेत. त्यामुळे एकाच भागात पदे द्यायला काहीजणांचा विरोध आहे. मोठ्या नावांपेक्षाही संघटनात्मक पदांवर काम केलेल्यांवर ही जबाबदारी द्यावी अशी भूमिका खासदार वंदना चव्हाण यांनी पक्षश्रेष्ठींकडे मांडली असल्याचे समजते. अशोक राठी हे पक्षाच्या स्थापनेपासून पक्षसंघटनेत सक्रिय आहेत. त्यांनी हे पद आपल्याला द्यावे अशी मागणी पक्षाकडे केली आहे. वंदना चव्हाण या सलग आठ वर्षे या पदावर आहेत. त्यांना मुक्त करून त्या पदावर पुन्हा दुसºया महिलेला संधी कशी द्यायची असेही पक्षात बोलले जात आहे. यातून मार्ग काढून पक्षश्रेष्ठी कोणाच्या नावावर शिक्कामोर्तब करतात की पुन्हा खासदार चव्हाण यांच्याकडेच ही जबाबदारी राहते याविषयी पक्षाच्या कार्यकर्त्यामध्ये उत्सुकता आहे.  

टॅग्स :PuneपुणेNational Congress Partyनॅशनल काँग्रेस पार्टीVandana Chavanवंदना चव्हाणAjit Pawarअजित पवार