नेहरूनगर : केंद्र सरकारने पाचशे-हजारच्या नोटाबंदीच्या निर्णयामुळे वल्लभनगर एसटी आगाराला याची झळ बसली असून, आठ टक्क्यांनी उत्पादनात घट झाली आहे.पैशांची टंचाई निर्माण झाल्यामुळे अनेक नागरिकांना शहरातून महत्त्वाच्या कामांसाठी गावाकडे अथवा राज्यात इतर जिल्ह्यांमध्ये जाण्यासाठी पैसे नसल्यामुळे मोठी अडचण निर्माण झाली होती. यामुळे नोव्हेंबर महिन्यामध्ये पहिल्या आठवड्यात एसटी आगाराचे मासिक उत्पन्न आठ टक्क्यांनी घटले आहे. याचबरोबर नवीन दोन हजारांची नवीन नोट चलनात आल्यानंतरदेखील एसटीमधील वाहकांना प्रवासादरम्यान सुटे पैसे नसल्याच्या कारणांमुळे अनेक वेळा प्रवासी व वाहकांमध्ये वाद झाले. सध्या पाचशेची नवीन नोट चलनात आल्यानंतर काही प्रमाणावर सुट्या पैशांमुळे होणारी अडचण दूर झाली आहे.वल्लभनगर आगार व्यस्थापक अनिल भिसे म्हणाले, ‘‘केंद्र सरकारने पाचशे-हजारांच्या नोटाबंदीच्या निर्णयामुळे वल्लभनगर एसटी आगाराला याची झळ बसली असून, नोटा बंदमुळे नोव्हेंबर महिन्याअखेर अनेक प्रवाशांनी पैसे नसल्याचे कारणांमुळे प्रवास करणे टाळल्यामुळे याचा फटका काही प्रमाणावर आगाराला बसला असून, आठ टक्क्यांनी उत्पन्नात घट झाली. सुटे पैसे नसल्याच्या कारणांमुळे प्रवाशांची काही प्रमाणावर गैरसोयदेखील झाली. प्रवासी अप्पासाहेब इंगवले म्हणाले, ‘‘केंद्र सरकारने काळा पैसा रोखण्यासाठी पाचशे-हजारांच्या नोटाबंदीच्या निर्णयामुळे सुरुवातीच्या काळात प्रवासादरम्यान सुटे पैशाअभावी मोठी अडचण निर्माण झाली होती. परंतु पाचशेच्या नवीन नोटा चलनात आल्यानंतर काही प्रमाणावर सुटे पैसेमुळे होणारी अडचण दूर झाली आहे.’’(वार्ताहर)
‘एसटी’च्या उत्पन्नाला ब्रेक
By admin | Published: December 22, 2016 2:06 AM