पुणे : जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या गट-गणांची फेररचनेचे काम पूर्ण झाली असून, जिल्हाधिकारी कार्यालयाच्यामार्फत हा प्रस्ताव शुक्रवारी विभागीय आयुक्तांना सादर करण्यात येणार आहे. या फेररचनेत हवेली, बारामती, शिरुर, जुन्नर आणि भोर तालुक्यात नव्याने निर्माण झालेल्या गट-गणांमध्ये मोठ्या प्रमाणात फेरबद्दल झाले असल्याची माहिती अधिकृत सूत्रांनी दिली.सन २०११ च्या जनगणनेनुसार जिल्ह्यात एकूण लोकसंख्या ३८ लाख ४७ हजार ३३२ इतकी निश्चित केली आहे. यानुसार एका गटाची लोकसंख्या ५१ हजार २२७ निश्चित करण्यात आली आहे. झपाट्याने वाढत असलेल्या नागरिकरणामुळे गेल्या काही वर्षांत हवेली, शिरुर आणि खेड तालुक्यातील लोकसंख्येत मोठी वाढ झाली आहे. यामुळेच गट-गणांची संख्या निश्चित करताना हवेली तालुक्यात नव्याने तीन गटांची भर पडली असून, खेड तालुक्यात दोन नगरपरिषदा निर्माण होऊन देखील येथील गटांची संख्या कमी झालेली नाही. तर शिरुर तालुक्यात देखील आता ६ ऐवजी ७ गट झाले आहेत.मात्र बारामती, भोर, जुन्नर आणि दौंड तालुक्यांमध्ये प्रत्येकी एक गट व दोन गण कमी झाले आहेत. यामुळे फेररचना करताना हवेली, शिरुर, बारामती, भोर, जुन्नर आणि दौंड तालुक्यात मोठ्या प्रमाणात बद्दल झाले आहेत. (प्रतिनिधी)
गट-गणांच्या फेररचनेत तोडफोड
By admin | Published: September 09, 2016 1:46 AM