शहरं
Join us  
Trending Stories
1
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
2
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
3
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
4
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
5
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
6
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
7
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल
9
गावाकडे पण, इकडे शहरातपण यादीत नाव ...! राज्यातील दहा मतदारसंघात नवी मुंबईकरांची नावे
10
Champions Trophy Tour: पाकचा डाव फसला! BCCI च्या आक्षेपानंतर ICC नं सेट केला कार्यक्रम
11
मणिपूरमधील जिरीबाममध्ये तीन मृतदेह सापडले, मंत्री आणि आमदारांच्या निवासस्थानाबाहेर गोंधळ; संचारबंदी लागू
12
पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवाराला वंचितने दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...
13
IND vs AUS: टीम इंडियात बदल होणार? संघात या दोघांना मिळू शकते 'वाइल्ड कार्ड' एन्ट्री
14
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
15
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
16
पत्रकार गुलाम आहेत; अमरावतीच्या सभेत राहुल गांधींचं विधान; पत्रकारांनी व्यक्त केला संताप
17
'बंटोगे तो कटोगें'वर कंगना यांचा घुमजाव; आधी म्हणाली, "हा विरोधकांचा मुद्दा" अन् नंतर...
18
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत टफ फाईट! सत्यजीत देशमुख की मानसिंगराव नाईक,कोण मारणार बाजी?
20
भारताने ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेला मागे टाकले! माजी पंतप्रधान लिज ट्रस म्हणाल्या, "पश्चिमात्य देशांची प्रतिष्ठा संकटात"

नोटबंदीमुळे नवीन वाहन विक्रीला ब्रेक

By admin | Published: November 17, 2016 3:37 AM

आठ दिवसांपूर्वी केंद्र सरकारने पाचशे आणि हजाराच्या नोटा चलनातून हद्दपार केल्या आहेत़ त्यामुळे नोटाबंदीचा परिणाम आता दुचाकी आणि चारचाकी शोरूममालकांना त्याचा चांगलाच फटका बसत आहे.

पिंपरी : आठ दिवसांपूर्वी केंद्र सरकारने पाचशे आणि हजाराच्या नोटा चलनातून हद्दपार केल्या आहेत़ त्यामुळे नोटाबंदीचा परिणाम आता दुचाकी आणि चारचाकी शोरूममालकांना त्याचा चांगलाच फ टका बसत आहे़ विविध स्कीम देऊनही ग्राहकांनी गेल्या आठ दिवसांपासून दुचाकी आणि चारचाकी वाहनांची साधी चौकशीही केली नसल्याची माहिती मालकांनी दिली आहे़ नोटाबंदीमुळे ग्राहकांनी सुमारे साठ ते सत्तर टक्के नवीन वाहन खरेदी करण्याचे नियोजन थांबविले. त्यामुळे ग्राहकांना वाहन विकत घेण्यासाठी कसे आकर्षित करायचे असा प्रश्न शोरूममालकांना पडला आहे़काळा पैसा आणि भ्रष्टाचाराचे उच्चाटन करण्यासाठी सरकारने ८ नोव्हेंबरपासून चलनातील पाचशे आणि हजाराच्या नोटा रद्द केल्या आहेत़ त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांपासून ते श्रीमंत लोकांपर्यंत अनेकांनी विविध खरेदीला लगाम घातला आहे़ अनेकांनी दुचाकी आणि चारचाकी गाड्यांची खरेदीसाठी नोंदणी केली होती़ मात्र, विविध शोरूममध्ये पाचशे आणि हजाराच्या नोटा स्वीकारल्या जात नाही़ गाडी घेण्यासाठी धनादेश, शंभराच्या नोटा आवश्यक आहे़ एवढी मोठी रक्कम एकदम भरणे शक्य नसल्यामुळे नागरिकांनी गाड्यांचे नियोजन पुढे ढकलल्याची माहिती शोरूम मालकांनी दिली़ मागील महिन्यापर्यंत दुचाकी आणि चारचाकी गाड्यांची चौकशी करण्यासाठी दिवसभरात साधारणपणे आठ ते दहा ग्राहक शोरूममध्ये येत होते़ पण गेल्या आठ दिवसांपासून नोटाबंदीच्या निर्णयानंतर दिवसात एक किंवा दोन ग्राहक जुजबी माहिती घेण्यासाठी शोरूममध्ये येत असल्याची माहिती मालकांनी दिली़ त्यामुळे वाहन विके्रत्यांच्या व्यवसायावर मोठा परिणाम झाला आहे़ अनेक ग्राहक जुन्या पाचशे आणि हजाराच्या नोटा घेऊन वाहनांची खरेदी करण्यासाठी येत आहेत़ या नोटा न स्वीकारल्याने शोरूममालक आणि ग्राहक यांच्यात असणारे संबंध ताणले जात आहेत़ त्यामुळे भविष्यातील व्यवसायावर परिणाम होण्याची शक्यता जाणकारांनी व्यक्त केली आहे़ एरवी ग्राहकांना वाहनांची माहिती देताना शोरूममधील कामगार व्यस्त असायचा; मात्र, काही दिवसांपासून ग्राहकांचा अत्यल्प प्रतिसाद आहे.(प्रतिनिधी)