शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्री होताच हेमंत सोरेन यांचा मोठा निर्णय, 'मैया सन्मान योजने'संदर्भात मोठी घोषणा
2
अमेरिकन भारतात पैसा गुंतवतात; मुकेश अंबानींनी अमेरिकेत केलं मोठं डील
3
PM Modi Salary: पंतप्रधान मोदींना दर महिन्याला सत्कार भत्ता म्हणून मिळतात केवळ 3000 रुपये, जाणूनघ्या किती आहे सॅलरी?
4
“आधी CM राज्यात ठरायचा आता दिल्लीत निर्णय होतो, अजितदादांनी वेगळा अनुभव घ्यावा”: काँग्रेस
5
इस्रायलनं काही तासांतच केलं युद्धविरामाचं उल्लंघन? लेबनानमध्ये हिजबुल्लाहच्या ठिकाणावर केला मोठा हवाई हल्ला
6
Killer Cat: पाळलेल्या मांजरीच्या हल्ल्यात एकाचा मृत्यू; पत्नी म्हणते...
7
विराट कोहली सोबत World Cup ची ट्रॉफी उंचावणाऱ्या भारतीय खेळाडूचा क्रिकेटला रामराम
8
शाही जामा मशिदीच्या सर्वेक्षणाविरोधात मशीद समितीची सर्वोच्च न्यायालयात धाव; उद्या सुनावणी
9
"घुमटात मंदिराचे अवशेष..., तळघरात आजही गर्भगृह विद्यमान"; अजमेर शरीफ दर्ग्यासंदर्भात हिंदू सेनेनं केले आहेत मोठे दावे
10
कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाईंचा ND स्टुडिओ आता 'गोरेगाव फिल्मसिटी'च्या ताब्यात!
11
“भाजपा नेहमीच नवीन नेतृत्वाचा शोध घेत असते, राजस्थान-मध्य प्रदेशप्रमाणे...”: चंद्रकांत पाटील
12
"शिंदेनी मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडलेला नाही", उदय सामंतांच्या विधानामुळे चर्चांना उधाण 
13
बाईकची टाकी फुल ठेवा, जास्त मायलेज मिळवा...! खरोखरच असे होते? तुम्हीही १००-२०० चेच भरता का...
14
IND vs PAK: भारताचा १३ वर्षीय वैभव सूर्यवंशी आता पाकिस्तानला चोपणार, सामना कधी?
15
पत्रकारानं थेट प्रश्न विचारला, अजित दादांनी मिश्किल उत्तर दिलं; म्हणाले, "मी काही ज्योतिष नाही..."! नेमकं काय घढलं?
16
मोठा दावा! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदही स्वीकारणार नाहीत; शिंदे गटातून कोण होणार नेता...
17
बांगलादेशात 'इस्कॉन'च्या चिन्मय कृष्ण दास यांना अटक, शेख हसिना यूनुस सरकाविरोधात आक्रमक
18
भारतातील मोबाईल, फोन नंबर +91 ने का सुरु होतात? कोणी दिला हा नंबर...
19
... तर राजकारणातून निवृत्ती घेईन, शहाजीबापू पाटील यांचे मोठे विधान
20
७.८३ टक्के मतं कशी वाढली? नाना पटोलेंच्या आरोपांवर निवडणूक आयोग म्हणतं, "हे सामान्य आहे कारण..."

देखभाल-दुरुस्तीअभावी ब्रेकडाऊन टॉप गिअरवर

By admin | Published: April 23, 2015 6:37 AM

कार्यशाळांमध्ये अपुरे मनुष्यबळ आणि योग्य देखभाल-दुरुस्तीअभावी पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपी) बसचे ब्रेकडाऊनचे (तांत्रिक बिघाड) प्रमाण बृहन्मुंब

पुणे : कार्यशाळांमध्ये अपुरे मनुष्यबळ आणि योग्य देखभाल-दुरुस्तीअभावी पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपी) बसचे ब्रेकडाऊनचे (तांत्रिक बिघाड) प्रमाण बृहन्मुंबई विद्युत पुरवठा व परिवहन उपक्रम (बेस्ट) आणि बंगळुरू महानगर परिवहन महामंडळाच्या (बीएमटीसी) बसच्या तुलनेत टॉप गिअरवर आहे. बेस्ट व बीएमटीसीपेक्षा पीएमपीच्या बसचे प्रमाण अनुक्रमे दुप्पट व तिपटीने कमी असूनही तांत्रिक बिघाडामध्ये मात्र ‘पीएमपी’ आघाडीवर आहे.‘पीएमपी’च्या ताफ्यात भाडेतत्त्वावरील बससह सध्या सुमारे २,२०० गाड्या आहेत. यांपैकी सध्या दररोज सुमारे ७२ टक्के बसच मार्गावर असतात. मार्गावर असलेल्या बसपैकी दररोज सुमारे दीडशे ते दोनशे बस तांत्रिक बिघाडामुळे मार्गावरच बंद पडतात. बे्रकडाऊनमुळे अनेकदा फेऱ्या रद्द करण्याची नामुष्की पीएमपीवर ओढवते. त्याचा परिणाम उत्पन्नावर तसेच प्रवाशांवरही होत आहे. बेस्ट व बीएमटीसीच्या बसचे ब्रेकडाऊनचे प्रमाण मात्र खूपच अत्यल्प आहे. बेस्टकडे असलेल्या सुमारे ४,२०० तर बीएमटीसीकडे असलेल्या सुमारे ६,५०० बसपैकी एकही बस भाडेतत्त्वावरील बस नाही. त्यामुळे त्यांच्या सर्व बसवर पूर्णपणे नियंत्रण असते. पीएमपीकडे खासगी ठेकेदारांकडे सुमारे १ हजार बस आहेत. या बसवर पीएमपीचे पूर्ण नियंत्रण नसते; त्यामुळे ब्रेकडाऊनचा आकडा वाढत जातो.दर हजार किलोमीटरमागे पीएमपीच्या सरासरी १.५ बस मार्गावर बंद पडतात. याचा विचार केला असता, बेस्टचे हे प्रमाण ०.५, तर बीएमटीसीचे प्रमाण केवळ ०.१ बस एवढे आहे. देखभाल-दुरुस्तीसाठी कुशल मनुष्यबळ, प्रशस्त व अत्याधुनिक उपकरणांनी सज्ज कार्यशाळांमुळे बेस्ट व बीएमटीसीचे ब्रेकडाऊनचे प्रमाण कमी आहे. दुसरीकडे ‘पीएमपी’कडे पुरेशा कुशल मनुष्यबळाबरोबर कार्यशाळाही सुसज्ज नाहीत. पीएमपीला ब्रेकडाऊनचे प्रमाण कमी करण्यासाठी देखभाल-दुरुस्तीचा वेग वाढवावा लागणार आहे.(प्रतिनिधी)