मागील सोळा दिवसांपासून अविरत हा उपक्रम सुरू असून त्याव्दारे कोरोना रुग्णांबरोबर, डॉक्टर, परिचारिका, वॉर्डमध्ये काम करणारे वैद्यकीय कर्मचारी आदी ७०० जणांना मोफत नाष्टा देण्यात येत आहे.
या उपक्रमासाठी वाघचौरे यांनी ५० जणांचा व्हॉट्सॲप ग्रुप बनवला आहे. त्याअंतर्गत मुंबई, नाशिक, अ.नगर, पुणेसह काही तालुके, तसेच बारामती तालुक्यातील काही जणांचा समावेश आहे. सुप्यातील काही किराणा दुकानदार व खासगी डॉक्टर यांची याकामी मदत मिळत आहे.
या दानशूर व्यक्तींच्या येणाऱ्या मदतीतून हा उपक्रम सुरू आहे. यासाठी सकाळी चार वाजता उठून नाष्टा बनविण्याकामी सागर वाघचौरे, आकाश राठोड, दत्ता वाघचौरे, विष्णू वाघचौरे, अक्षय काळे आदींची मदत होते. त्यानंतर सकाळी आठ वाजेपर्यंत कोविड सेंटरमधील रुग्णांपर्यंत त्याचे वाटप करण्यात येते. दर रविवारी नाष्टयासह दुपारी मांसाहार जेवण देण्यात येत असल्याची माहिती विलास वाघचौरे यांनी दिली. सुप्यात मागील आठवड्यात कोविड सेंटर सुरू झाले आहे. मात्र, त्या अगोदरपासून मोरगाव येथील कोविड सेंटरच्या रुग्णांना नाष्टा देण्याचे काम सुरू आहे. तसेच दोन्ही ठिकाणी कोविड सेंटर आहे, तोपर्यंत हा उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे वाघचौरे त्यांनी सांगितले.
देऊळगाव रसाळ येथील तरुणांनी मागील आठवड्यात एकत्र येत एक हात मदतीचा या उपक्रमाद्वारे देऊळगाव रसाळ येथे विलगीकरणात असणारे रुग्ण आणि सुपे व सोमेश्वर येथील कोविड सेंटरमधील सुमारे १०० रुग्णांना दररोज सकाळी उकडलेली प्रत्येकी दोन अंडी देण्यात येत असल्याची माहिती अय्याज इनामदार यांनी दिली.
या सेंटरमधील एखाद्या रुग्णाचा मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबाला अंत्यविधीसाठी पीपीकिट मोफत उपलब्ध करुन देणार असल्याचे त्यांनी सांगितले. या तरुणाने सोनपीरवाडीत आरीफ इनामदार, अहमद इनामदार, इम्राम इनामदार, शुभम कुंजीर, साहिल इनामदार, तोशिक इनामदार, फारुख इनामदार, रशीद काझी आदींच्या वतीने ‘एक हात मदतीचा’ हा उपक्रम राबवित असल्याचे इनामदार यांनी सांगितले.
--ॉ
चौकट
कोविड केअर सेंटरमध्ये सुपे येथील शाहमन्सूर दर्गा वक्फ कमेटीच्या माध्यमातून कोरोना रुग्णांसाठी १० वाफेचे मशिन (स्टीम मशिन) व रुग्णांना १० ब्लॅंकेट वाटप करण्यात आल्याचे कमेटीचे चिफ ट्रस्टी युनूस कोतवाल यांनी सांगितले. यावेळी येथील बोरकर बंधूतर्फे ( सनी चायनीज) कोरोना रुग्णांसाठी चिकन सूपचे वाटप केल्याचे सांगितले.
याप्रसंगी माजी सभापती नीता बारवकर, मार्केट कमिटीचे माजी सभापती शौकत कोतवाल, दर्गा कमिटीचे खजिनदार समीर डफेदार, अयूब शेख, पिंटू मोगल तसेच अनिल हिरवे, मुनीर डफेदार, अशोक लोणकर, काका कुतवळ, संजय बारवकर, गणेश बोरकर आदी उपस्थित होते.
........................................
फोटो १८ सुपे एक घास आईचा
फोटो -
सुपे येथे कोविड सेंटरमधील रुग्णांना दररोज वेगवेगळा नाष्टा देताना कार्यकर्ते.