पुणे : लोकशाहीचा सर्वात मोठा उत्सव मानल्या जाणाऱ्या निवडणुकीत आज पुणे लोकसभा मतदारसंघात चौथ्या टप्प्यात मतदान होत आहे. या मतदानाला मतदारांनी सकाळी सात वाजल्यापासून उस्फुर्त प्रतिसाद दिला. पाहिले मतदान नंतर न्याहरी असा काहीसा ट्रेंड आज बाणेर बालेवाडी व परिसरात पाहण्यास मिळाला. बाणेर बालेवाडी येथील सर्वच मतदान केंद्रावर सकाळी सात वाजल्यापासून नागरिकांनी मतदानासाठी गर्दी केली होती. काही जण मॉर्निंग वॉक साठी आले व त्यानंतर लागलीच मतदान केंद्र गाठले. तर अनेक जण आवर्जून सकाळी लवकर मतदान करू या उद्देशाने आले होते. यामुळे सात ते आठ या पहिल्या तासात साधारणतः 70 ते 80 जणांनी प्रत्येक बूथ मध्ये मतदान केल्याचे दिसून आले. यामध्ये जेष्ठ नागरिकांसह तरुण वर्ग ही मोठ्या प्रमाणात होता. अनेक मतदारांना मतदान स्लिप मिळाल्याने मतदान केंद्रावर सकाळी गोधळ झालेला दिसला नाही. मतदान स्लिप असल्याने मतदान केंद्रावरील कर्मचाऱ्यांचे काम ही सोपे झाल्याचे दिसून आले.
Pune Lok Sabha: सकाळच्या पहारी मतदानानंतरच न्याहरी; जेष्ठ नागरिकांसह तरुणांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
By निलेश राऊत | Published: May 13, 2024 9:05 AM