Breaking : तळोजा कारागृह ते कोथरूड ३०० वाहनांच्या ताफ्यासह मिरवणूक काढणारा गुंड गजानन मारणे फरार 

By ऑनलाइन लोकमत | Published: February 20, 2021 04:52 PM2021-02-20T16:52:42+5:302021-02-20T16:58:49+5:30

अजित पवारांनी सुनावल्यानंतर दुसऱ्याच दिवशी पुणे पोलिसांवर ओढवली नामुष्की..

Breaking : Gajanan Marne was escaped who marching from Taloja Jail to Kothrud with a convoy of 300 vehicles | Breaking : तळोजा कारागृह ते कोथरूड ३०० वाहनांच्या ताफ्यासह मिरवणूक काढणारा गुंड गजानन मारणे फरार 

Breaking : तळोजा कारागृह ते कोथरूड ३०० वाहनांच्या ताफ्यासह मिरवणूक काढणारा गुंड गजानन मारणे फरार 

googlenewsNext

पुणे : तळोजा कारागृहातून सुटल्यानंतर ३०० वाहनांच्या ताफ्यासह जंगी मिरवणूक काढत प्रतिष्ठा वाढविण्याचा प्रयत्न करणाऱ्या कुख्यात गुंड गजानन मारणे याच्यावर पुणेपोलिसांनी एकामागोमाग गुन्हे दाखल करण्यास सुरुवात केली आहे. या धडक कारवाईनंतर सध्या मारणे व त्याच्या साथीदारांची जामिनावर मुक्तता करण्यात आली होती. आता गजानन मारणे फरार झाल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. 

कुख्यात गजानन मारणे याची २ खुनाच्या खटल्यातून मुक्तता झाल्यानंतर त्याच्यावर आणखी खटले नसल्याने सोमवारी सायंकाळी मारणे याची तळोजा कारागृहातून सुटका करण्यात आली.तेव्हा त्याचे स्वागत करण्यासाठी कारागृहाबाहेर त्याचे हजारो समर्थक उपस्थित होते. त्यांनी महाराष्ट्राचा किंग असे स्टेटस टाकत त्यांची एक्सप्रेस हायवेवरुन जंगी मिरवणुक काढली. त्यात शेकडो चारचाकी गाड्या सहभागी होत्या. गजानन मारणे याच्यावर तळेगाव दाभाडे, हिंजवडी, वारजे, कोथरुड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आले आहे. 

अजित पवारांनी सुनावल्यानंतर दुसऱ्याच दिवशी पुणे पोलिसांवर ओढवली नामुष्की.. 
तळोजा कारागृहातून सुटल्यानंतर एका गुंडाची कोथरूडपर्यंत मोटारींच्या ताफ्यातून निवडणूक निघते. ही बाब सामाजिक आरोग्यासाठी योग्य नाही. अशा कोणत्याही स्वरूपात गुन्हेगारीचे उदात्तीकरण होता कामा नये. कारण त्यांचा आदर्श तरूण पिढी घेते. पोलिसांनी असे प्रकार अजिबात खपवून मी घेऊ नयेत. चोर आणि गुन्हेगारांवर पोलिसांचा वचक असलाच पाहिजे, अशा शब्दात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पोलिस खात्याला सुनावले होते. नि त्याच्या दुसऱ्याच दिवशी गजानन मारणे फरार झाल्यामुळे बापूने पोलिसांची मोठी कोंडी झाली आहे. 

कोण आहे गजानन मारणे?
पप्पु गावडे आणि अमोल बधे या खून प्रकरणात २०१४ मध्ये गजानन मारणे व त्याच्या समर्थकांवर मोक्का अंतर्गत कारवाई झाली होती. तेव्हापासून मारणे हा तुरुंगात होता. सुरुवातीला येरवडा कारागृहात ठेवण्यात आले होते. त्यानंतर त्याला कोल्हापूरला हलविले. सध्या तळोजा कारागृहात ठेवण्यात आले हाेते.गजानन मारणे हा सोमवारी सायंकाळी ५ वाजून ४५ मिनिटांनी कारागृहाबाहेर आला. यावेळी कारागृहाबाहेर मोठा जमाव जमला होता. त्यानंतर त्याच्या सर्व गाड्या एकामागोमाग एक्सप्रेस हायवेने पुण्याकडे रवाना झाला. 

टोल न भरता ताफा पुढे.... 

एरवी टोलनाक्यावरील कर्मचारी एकाही वाहनांना सोडत नाही. मात्र, गजानन मारणे याच्या पुढे मागे शेकडो कार होत्या. त्या सर्व गाड्यांचे दोन्ही
नाक्यांवर टोल न भरताच वेगाने पुढे रवाना झाल्या. उर्से टोलनाक्यापर्यंत ही मिरवणुक सुरु होती. त्यानंतर समर्थकांच्या गाड्या वेगवेगळ्या मार्गाने रवाना झाल्या. कोथरुडमधील पौड रोड येथील घरी रात्री दोन -तीन गाड्यांसह गजानन मारणे घरी पोहचला.

Web Title: Breaking : Gajanan Marne was escaped who marching from Taloja Jail to Kothrud with a convoy of 300 vehicles

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.