शहरं
Join us  
Trending Stories
1
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
4
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
5
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
6
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
7
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
8
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
9
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
10
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
11
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

परदेशी दौऱ्यांमुळे महापालिकेतील कामांना ब्रेक

By ऑनलाइन लोकमत | Published: November 16, 2018 2:01 AM

आयुक्त, पदाधिकाऱ्यांसह २१ नगरसेवक दौऱ्यात सहभागी : सभा तहकूब

पुणे : स्मार्ट सिटी प्रकल्पाच्या स्पेन येथील बार्सिलोना येथे आयोजित करण्यात आलेल्या परिषदेत सहभागी होण्यासाठी महापालिकेचे सर्व पदाधिकारी, आयुक्त आणि तब्बल २१ नगरसेवक परदेश दौऱ्यावर गेले आहेत. अधिकारी, पदाधिकाऱ्यांच्या या परदेश दौऱ्यामुळे मुळे मात्र दिवाळी सुट्टीनंतरदेखील महापालिकेचे कामकाज सुस्त झाले असून, उपस्थितीअभावी अनेक सभा तहकूब करण्याची वेळ आली आहे.

केंद्र शासनाच्या महत्त्वाकांक्षी स्मार्ट सिटी योजनेत पुणे महापालिकेचा समावेश आहे. देशातील स्मार्ट सिटीअतंर्गत राबविण्यात आलेल्या विविध प्रकल्प, योजनांच्या माहितीची देवाण-घेवाण करण्यासाठी व नव्याने काही योजना, प्रकल्पांवर चर्चा करण्यासाठी स्पेन येथील बार्सिलोना शहरात स्मार्ट सिटीवर तीन दिवसांची परिषद आयोजित करण्यात आली आहे. परिषदेत सहभागी होण्यासाठी बार्सिलोना शहराकडून महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्यासह महापौर मुक्ता टिळक यांना निमत्रंण आले, त्यानुसार महापालिका आयुक्त, महापौरांसह, सभागृहनेते श्रीनाथ भिमाले, स्थायी समिती अध्यक्ष योगेश मुळीक, शहर सुधारण समितीचे अध्यक्ष सुशील मेंगडे आदी सर्वच पदाधिकारी आणि तब्बल २१ नगरसेवक स्मार्ट सिटीच्या या दौºयात सहभागी झाले आहेत. यामध्ये नगरसेवक स्वखर्चाने सहभागी झाल्याची चर्चा आहे. परंतु पदाधिकारी, अधिकारी आणि नगरसेवकांच्या या परदेशदौºयामुळे महापालिकेचे कामकाज थंड पडले आहे.उपस्थितीअभावी समित्यांच्या सभा तहकूबस्मार्ट सिटीच्या प्रकल्पांसाठी स्पेन येथील बार्सिलोना येथे आयोजित करण्यात आलेल्या तीन दिवसांच्या परिषदेसाठी आयुक्त, महापौर, सभागृह नेते यांच्यासह विषय समित्यांचे अध्यक्ष सहभागी झाले आहेत. याशिवाय सत्ताधारी भाजपाचे अन्य २१ नगरसवेकदेखील दौºयात सहभागी झाले आहेत. यामुळे या आठवड्यात घेण्यात आलेल्या महिला व बालकल्याण समिती, स्थायी समिती, क्रीडा समिती आदी समित्यांच्या बैठका सदस्यांच्या उपस्थितीअभावी तहकूब करण्याची वेळ आली आहे.पहिला आठवडा सुट्टीचादिवाळीमुळे महापालिकेला यंदा प्रथमच सलग ६ दिवस सुट्टी होती. यामुळे नोव्हेंबरचा पहिला आठवडा सुट्टीमध्येच गेला. त्यानंतर सोमवार (दि.१२) पासून महापालिकेचे कामकाज सुरु झाले. परंतु आयुक्तांसह, महापौर, सर्व पदाधिकारी आणि २१ नगरसेवक ९ नाव्हेंबर ते १८ नाव्हेंबरपर्यंत परेदश दौºयावर आहेत. यामुळे कामकाज सुरू होऊनदेखील लोकांची अपेक्षित कामे मात्र सुरू झालेली नाहीत.

टॅग्स :Puneपुणे