पुणे : नव्याने लॉकडाऊन सुरू केल्याने शहरातील प्रदूषणावर मोठा परिणाम झाला असून, पुणेकरांना आता दहा दिवस शुद्ध हवेचा श्वास घेता येणार आहे. कारण सर्व वाहने, धूर सोडणारी कारखाने बंद आहेत. पहिल्याच दिवशी शहरातील पीएम २.५ ची पातळी ३० वर आली असल्याने ती आरोग्यासाठी अतिशय चांगली आहे.शहरात संपूर्ण लॉकडाऊन केल्याने लाखो वाहने रस्त्यावर आली नाहीत. त्यामुळे हवेची पातळी धोकादायकवरून चांगली या स्थितीवर आल्याचे स्पष्ट होत आहे. या काळात ज्यांना प्रदूषणामुळे विविध आजारांचा त्रास होत होता, तो देखील कमी झाला. या विषयी फुफ्फुसविकार तज्ज्ञ आणि चेस्ट रिसर्च फांउडेशनचे प्रमुख डॉ. संदीप साळवी यांनी माहिती दिली. ते म्हणाले,वाहने कमी झाल्याने कार्बन डायऑक्साइड बंद झाला. ज्यांना फुफ्फुसाचा, हृदयाचा आजार आहे, अस्थमा, ब्लडप्रेशर आहे, त्यांना या दहा दिवसांमध्ये शुध्द हवा मिळणार आहे. अन्यथा इतर वेळी शुध्द हवा मिळत नाही. लॉकडाऊनमुळे मोठा आर्थिक फटका सहन करावा लागत आहे. त्याच्या बदल्यात शुध्द हवा आपल्याला घेता येत आहे.
शुध्द हवा म्हणजे काय ?नायट्रोजन : ७८.०९ %ऑक्सिजन : २०.९५%अरगॉन : ०.९३ % काबर्न डायऑक्साइड : ०.०४ %पाण्याची वाफ : ०.४
प्रदूषणाचा शरीरावर काय परिणाम ?एरवी शहरात शुध्द हवा मिळत नाही. त्यासोबत कार्बन डायऑक्साइड, धुलीकण, बॅक्टेरिया, विषाणू, विविध परागकण आपण श्वासाद्वारे शरीरात घेत असतो. जे आपल्या शरीराला हानी पोचवतात. यामुळे हृदयावर परिणाम होऊन हायपरटेंशन, हृदयाचे आजार, हृदय बंद पडणे असा धोका असतो. फुफ्फुसांना इन्फेक्शन, विसराळूपणा, अस्थमा, फुफ्फुसाचा कॅन्सर, स्ट्रोक, अल्झायमर असे आजार होऊ शकतात.===============================१ लिटर इंधन जाळण्यासाठी १७०० लिटर ऑक्सिजनचारचाकी वाहन चालविण्यासाठी १ लिटर पेट्रोल लागत असेल, तर त्या इंधनाला जळण्यासाठी १७०० लिटर ऑक्सिजनची गरज असते. याचाच अर्थ आपण किती मोठ्या प्रमाणावर ऑक्सिजन वापरतो आणि त्यातून आपल्यालाच घातक धूर हवेत सोडतो. ऑक्सिजन नसेल, तर पेट्रोल असूनही वाहन सुरू होणार नाही, अशी माहिती डॉ. संदीप साळवी यांनी दिली.==========================
पुण्यातील हवेची गुणवत्तामार्च २०२० : १८४जुलै २०२० : ३५ ==================हवेची गुणवत्ता०-५० : स्वच्छ हवा५०-१००: समाधानकारक१००-३०० : खराब