शहरं
Join us  
Trending Stories
1
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
2
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
3
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
4
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
5
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
6
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
7
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल
9
गावाकडे पण, इकडे शहरातपण यादीत नाव ...! राज्यातील दहा मतदारसंघात नवी मुंबईकरांची नावे
10
Champions Trophy Tour: पाकचा डाव फसला! BCCI च्या आक्षेपानंतर ICC नं सेट केला कार्यक्रम
11
मणिपूरमधील जिरीबाममध्ये तीन मृतदेह सापडले, मंत्री आणि आमदारांच्या निवासस्थानाबाहेर गोंधळ; संचारबंदी लागू
12
पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवाराला वंचितने दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...
13
IND vs AUS: टीम इंडियात बदल होणार? संघात या दोघांना मिळू शकते 'वाइल्ड कार्ड' एन्ट्री
14
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
15
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
16
पत्रकार गुलाम आहेत; अमरावतीच्या सभेत राहुल गांधींचं विधान; पत्रकारांनी व्यक्त केला संताप
17
'बंटोगे तो कटोगें'वर कंगना यांचा घुमजाव; आधी म्हणाली, "हा विरोधकांचा मुद्दा" अन् नंतर...
18
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत टफ फाईट! सत्यजीत देशमुख की मानसिंगराव नाईक,कोण मारणार बाजी?
20
भारताने ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेला मागे टाकले! माजी पंतप्रधान लिज ट्रस म्हणाल्या, "पश्चिमात्य देशांची प्रतिष्ठा संकटात"

लाचखोर अधिकारी शैलजा दराडेला १२ ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी

By ऑनलाइन लोकमत | Published: August 08, 2023 2:20 PM

सोमवारी पुणे पोलिसांनी दराडेंना अटक केली होती...

- किरण शिंदे

पुणेशिक्षण विभागात नोकरी लावण्याचा आमिषाने 44 जणांची कोट्यावधी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या तत्कालीन आयुक्त शैलजा रामचंद्र दराडे यांना हडपसर पोलिसांनी सोमवारी सायंकाळी अटक केली होती. दराडे यांना आज कोर्टात हजर केले असता 12 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. 

शैलजा दराडे यांनी 2019 साली नोकरी लावण्याच्या आमिषाने 44 लोकांकडून पैसे स्वीकारले. तलाठी आणि आरटीओ परीक्षेत पास करण्याचे अमिश दाखविले आणि वेगवेगळ्या नागरिकांकडून जवळपास 4 कोटी 85 लाख रुपये स्वीकारले. यासंदर्भातील त्यांचे काही ऑडिओ जप्त करण्यात आले आहेत. या ऑडिओतील आवाजाची सत्यता तपासण्यासाठी 7 पोलीस कोठडी देण्यात यावी अशी मागणी सरकारी वकिलांनी केली होती. 

शैलजा दराडे यांनी आपल्या पदाचा गैरवापर करून पैशाचा अपहार केला. हुशार विद्यार्थ्यांना डावलून पात्रता नसणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांनी नोकरी लावली असण्याची शक्यता आहे. अशाप्रकारे पैशाच्या आमिषाने दराडे यांनी आणखी काही लोकांना नोकरी लावली का? असा प्रश्न आहे. खोटी आश्वासने देत त्यांनी 4 कोटी 85 लाख स्वीकारले. हे पैसे त्यांनी कुठे ठेवले, या पैशातून त्यांनी काही मालमत्ता विकत घेतली का, याचा तपास करण्यासाठी पोलीस कोठडी देण्याची मागणी सरकारी वकिलांनी केली होती. त्यानंतर न्यायालयाने दराडे यांना 12 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. 

शैलजा दराडे यांच्यासह त्यांचा भाऊ दादासाहेब दराडे यांच्याविरोधात फेब्रुवारी महिन्यात हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी पोपट सूर्यवंशी यांनी तक्रार दिली आहे.

टॅग्स :PuneपुणेEducationशिक्षण