सासवड : पुरंदर तालुक्यातील आदर्श क्रांती संघटनेच्या वतीने मोफत सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन २१ मे रोजी पुरंदर हायस्कूल सासवड येथे सायंकाळी सहा वाजता केले आहे. संघटनेचे सामुदायिक विवाह सोहळा आयोजनाचे सलग १७वे वर्ष असून, सर्व समाजातील लोकांनी या मोफत विवाह सोहळ्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन संघटनेचे संस्थापक संजय ज्ञानोबा जगताप यांनी केले.
या विवाह सोहळ्यातील वधू-वरांना लग्नाचा पोशाख, जीवनावश्यक संसारोपयोगी भांडी, बूट, चप्पल व मंगळसूत्र, तसेच लग्नात येणाऱ्या सर्व व्यक्तींच्या भोजनाची व्यवस्था, भव्य मिरवणूक अशा प्रकारची व्यवस्था संघटनेच्या माध्यमातून करण्यात येत आहे. विवाह नोंदणी सासवड व जेजुरी येथे सुरू आहे. तसेच, शासनाच्या शुभमंगल योजनेच्या नियमानुसार संबंधित जोडप्यास १० हजार रूपये दिले जातील, अशी माहिती बाळासाहेब भिंताडे, विकास जगताप राहुल इनामके यांनी दिली.