खोडद : सध्या लग्नसराई मोठ्या प्रमाणात सुरू झाली आहे. निदान या वर्षी तरी मुलाच्या लग्नाचा बार उडवून देऊ, असे म्हणणाऱ्या व मुलासाठी वर्षभर मुलगी पाहणाऱ्या बापांच्या नशिबी यंदाही घोर निराशाच येत असल्याचे चित्र गावोगावी पहावयास मिळत आहे. त्यामुळे वरपित्याच्या तोंडी आपसूकच ‘नवरी न मिळे नवऱ्याला’ हे हताश शब्द येत आहेत.जुन्नर तालुक्यासह खोडद गावामध्ये अनेक वर्षांपासून मुला-मुलींच्या लिंगगुणोत्तराचे प्रमाणात मुलींचे प्रमाण कमीच आहे. साºया भारतातील ही एकंदर परिस्थिती असल्याने अनेक वर्षांपासून स्त्रीभ्रूण हत्या थांबविण्यासाठी अनेक उपक्रम राबविले गेले. शिवाय अनेक ठिकाणी महिला दिनाच्या निमित्तानेही स्त्रीचा सन्मान, सत्कार करण्यात आला मात्र आकडेवारी पाहिली तर आजही मुलींचे प्रमाण मुलांपेक्षा कमी असल्याचे दिसते. त्याचा थेट परिणाम मुलांवर अर्थात त्यांच्या लग्नावर झालेला दिसतो आहे.खरंतर पूवीर्पासून लग्न जुळवताना मुलाच्या बापाचाच तोरा पहायला मिळायचा, मग लग्नातील मानपान, देणे-घेणे, सर्व काही मनासारखे तो वाजवून घ्यायचा, मात्र काळ बदलला आणि मुलींचे प्रमाण कमी झाल्याने मुलींच्याच वडिलांची कॉलर सध्या उंच झालेली पहावयास मिळत आहे. ‘हुंडा नको मामा फक्त पोरगी द्या मला’ मुलगी द्या असे म्हणण्याची नामुष्की सध्या मुलांच्या वडिलांवर येऊन ठेपली आहे.एखादा बाप जरी ‘दुबळा’ असला तरी पण तो आता त्याच्या घरात जन्माला आलेल्या मुलीमुळे खरा ‘श्रीमंत’ असल्याचे पहायला मिळत आहे.मुलीच्या ‘किमान’ अटी अशासरकारी नोकरीच पाहिजेखासगी कंपनीत असेल तर गलेलठ्ठ वेतन हवेकिमान १ एकर शेती हवीस्वत:चे घर हवेपुणे शहरात फ्लॅटतरी हवाएकुलता एक हवाएकत्र कुटुंब पद्धती नकोलग्नानंतर मुलीला नोकरीस पाठवायची तयारी हवीमुलगा निर्व्यसनी हवामुलीचे स्थळ सुचविण्यासाठी पाचशे रुपयेमुलींच्या कमतरतेवरसुध्दा बाजार मांडणारी एजंटचा यानिमित्ताने सुळसुळाट झाला आहे. गोड भाषेत त्यांना मध्यस्थी असे म्हटले जात असले तरी त्यांची मध्यस्थी ही धर्मादाय नसून व्यावसायिक असल्याने वरपित्याला त्यांची झळ बसते आहे. मुलाला अनुरुप मुलीचे स्थळ सुचविण्योसाठी ५०० रुपये तर त्यांच्याशी जमवून देण्यासाठी २५ हजार रुपयांपर्यंत ‘शुल्क’ आकारले जात आहेत. सध्या हा मध्यस्थीचा व्यवसाय चांगचाल तेजीत चालू आहे.
नवरी ‘न’ मिळे नवऱ्याला; वधूपित्याच्या अपेक्षा वाढल्या
By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2019 1:34 AM