----
खेड शिवापूर : देशाच्या सीमा भागामध्ये मुख्यतः डोंगर नद्या, दरी, बर्फाच्छादित शिखरे व इतर ठिकाणे व विविध सीमाभागातील असलेल्या भौगोलिक अडथळ्यांना जलद गतीने पार करण्यासाठी आणि त्याचबरोबर भारतीय सैन्यदलाची चपळता वृद्धिंगत करण्यासाठी अवघ्या काही मिनिटात ब्रिज बांधण्याची प्रणाली पुण्यातील : संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (डीआरडीओ), दिघी येथील अभियांत्रिकी प्रयोग शाळेतील संशोधन व विकास आस्थापन आर अँड डी.ई (ई.) यांच्या संयुक्त विद्यमाने विकसित करण्यात आली आहे. त्याचा शुभारंभ वेळू (ता. भोर) येथील वर्ल्डवाईल्ड ऑईलफिल्ड मशिन कंपनीमध्ये करण्यात आला.
याप्रकल्पाची माहिती देताना अभियांत्रिकी प्रयोग शाळेतील संशोधन व विकास आस्थापन आर.अँड डी. ई (ई.) संचालक डॉ. प्रदीप कुरुळकर म्हणाले की, हा 'ब्रिजिंग सिस्टीम' उपयोगी पडणार आहे. सीमा भागामध्ये अनेक अशी ठिकाणे आहेत की ज्या ठिकाणी मानवी क्षमतेचा कस लागतो जवानांना पाठीवरती वजन घेऊन चालने ही मुश्किल असते, अशा ठिकाणी या ब्रिजिंग सिस्टीममुळे त्यांचे श्रम कमी होणार असून कमी वेळेमध्ये तेे आपले लक्ष्य गाठू शकतात.
संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (डीआरडीओ) व पुण्यातील दिघी येथील अभियांत्रिकी प्रयोग शाळेतील संशोधन व विकास आस्थापन आर अँड डी.ई ( ई.) यांच्या संयुक्त विद्यमाने विकसित भारतीय सैन्य दलासाठी उपयुक्त अशा ब्रिजिंग प्रणालीच्या उत्पादनचा शुभारंभ वेळू (ता. भोर) येथील वर्ल्डवाईल्ड ऑईलफिल्ड मशिन कंपनीमध्ये करण्यात आला.
या पुलाची लांबी जास्तीत जास्त ३४.५ मीटर तर रुंदी ०.८ मीटर एवढी असणार आहे. वेगवेगळ्या लांबीच्या पुलांसाठी मॉड्युलर पद्धतीने सुट्या भागात हा पूल तयार करण्यात आला आहे. यासाठी उच्च क्षमता असलेले अॅल्युमिनियम धातूच्या मिश्र धातूपासून याची उपकरणे बनवणार आहे. पुलासाठी लागणारे सुट्टे भाग प्रत्येकी केवळ १८ किलो किंवा त्या पेक्षा कमी वजनाचे असणार आहेत. त्यामुळे अगदी सहजरित्या वाहून नेऊ शकतात. एका व्यक्तीस ते सहज उचलता येईल. त्याचप्रमाणे ते दरी, ओढे नाले यांच्यावर एकमेकास हे सुट्टे भाग जोडून हा पूल सहज तयार केला जाऊ शकतो फक्त १५ जवान अवघ्या ९० मिनिटांत हा पूल तयार करू शकतील अशी रचना उपकरणांची केलेली आहे.
याप्रसंगी आर ॲण्ड डी ई (ई) चे विभाग संचालक मकरंद जोशी, वर्ल्डवाईल्ड ऑईलफिल्ड मशिनचे मुख्यव्यवस्थापक मानसिंग फासे, क्षितिज माईनकर, मुख्य मानव संसाधन विकास अधिकारी शिवाजी चौंडकर, सी.एफ.ओ. मंगेश अन्नछत्रे, म्यागनम फोर्जचे निनाद ओक, म्याग्ना कास्टिंगचे रामचंद्र घळसासी आदी उपस्थित होते.
--
चौकट
--
देशाच्या संरक्षण क्षेत्राला आवश्यक असणारी प्रणाली बनवण्यासाठी डीआरडीओ ही संस्था कायमच अग्रेसर असते. सीमावर्ती भागातील प्रत्यक्ष सीमारेषेवर ती उभ्या असलेल्या जवानांना आवश्यक त्या अभियांत्रिकी सोयीसुविधा पुरवण्याचा आमचा प्रयत्न असतो याच प्रयत्नातून हे एक छोटेसे स्वरूप आहे संरक्षण क्षेत्राव्यतिरिक्त सर्वसामान्य नागरिकांसाठी आपत्कालीन परिस्थितीमध्ये ब्रिजिंग सिस्टम ही यंत्रणा अत्यंत उपयोगी ठरू शकते.
- डॉ. प्रदीप कुरुळकर, संचालक R. & DE (E)
--
बुलेट्स
ब्रिजिंग सिस्टीमची मुख्य वैशिष्ट्ये
वाहतुकीसाठी अत्यंत सोपा पूल तयार करण्यासाठी लागणार वेळ अवघी ९० मिनिट
सुट्या भागाचे प्रत्येकी वजन अवघे १८ किलो *
मावर्ती भागात कमी वेळेत डोंगरकडे नद्या नाले पार करण्यास सैनिकांसाठी अत्यंत उपयुक्त उभारणीसाठी अत्यंत कमी मनुष्यबळ लागते. सुट्या भागात तयार होतो व खोलता ही येतो