पुणे : शहरातील रस्त्यांवर धावणाऱ्या मळकट बस, ही पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपी) बसची असलेली स्थिती आता बदलणार आहे. प्रशासनाने सहा आगारांमध्ये अत्याधुनिक स्वयंचिलत स्वच्छता यंत्रे बसविली आहेत. या माध्यमातून केवळ ५ ते १० मिनिटांत बस चकचकीत होऊन मार्गावर येईल.‘पीएमपी’च्या खिळखिळ्या बसप्रमाणे अस्वच्छ बसबाबत प्रवाशांसह नागरिकांच्याही अनेक तक्रारी असतात. बाहेरून मळकट तर आतमध्ये कचरा, गुटख्याच्या पिचकाºयांचे डाग असतात.सध्या मार्गावर सुमारे १,५०० बस धावत असून त्यांपैकी सुमारे १,१०० बस पीएमपीच्या मालकीच्या आहेत. एकूण १३ आगारांमार्फत या बसचे संचालन होते; पण बहुतेक आगारांमध्ये बस स्वच्छ करण्यासाठी अत्याधुनिक स्वयंचलित यंत्रणा नसल्याने अनेक वेळा अस्वच्छ बसच मार्गावर येतात. आता हे चित्र बदलणार असून प्रशासनाकडून बसच्या स्वच्छतेसाठी आधुनिक स्वयंचलित स्वच्छता यंत्रे खरेदी करण्यात आली आहेत.बस स्वच्छ करण्याची यंत्रणापहिल्या टप्प्यात स्वारगेट, पिंपरी, कोथरूड, शेवाळवाडी, मार्केटयार्ड आणि पुणे स्टेशन या सहा आगारांमध्ये ही यंत्रे बसविण्यात आली आहेत. उर्वरित सात आगारांमध्येही पुढील काही दिवसांत ही यंत्रे बसविण्यात येणार आहेत. प्रत्येक यंत्राची किंमत सुमारे ६ लाख २० हजार रुपये एवढी आहे. कमानीच्या आकाराच्या या यंत्राच्या दोन्ही बाजूंना ब्रश असून त्या माध्यमातून एका वेळी दोन्ही बाजूंनी बस स्वच्छ होणार आहे. यापूर्वीही काही आगारांमध्ये स्वयंचलित यंत्रणा होती. तसेच, सफाई कर्मचाºयांमार्फत बस स्वच्छ केल्या जात होत्या; पण त्यासाठी लागणारा वेळ, खर्च परवडणारा नव्हता. आता या यंत्रांमुळे वेळेची मोठी बचत होणार असून अधिकाधिक स्वच्छ बस मार्गावर येणार असल्याचे अधिकाºयांनी सांगितले.
चकचकीत बस वाढणार, बस स्वच्छ करण्याची यंत्रणा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 12, 2018 6:04 AM