लोकमत न्यूज नेटवर्क
भोर : ब्रिटिशकालीन दगडी भाटघर धरण रविवारी पहाटे दोन वाजता १०० टक्के भरले. धरणाच्या ४५ स्वयंचलीत ४५ पैकी ११ दरवाजांतून १ हजार १७१ क्युसेक प्रति सेकंद वेगाने पाण्याचा विसर्ग होत आहे. नीरा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. गतवर्षीच्या तुलनेत पाऊस कमी असल्याने धरण २१ दिवस उशिराने भरले आहे.
भाटघर धरणाची पाणी साठवण क्षमता ही २४ टीएमसी आहे. धरणाला एकूण ८१ दरवाजे आहेत. त्यातील ४५ दरवाजे स्वयंचलित आहेत. ३६ दरवाजे रोलिंगचे आहेत. यातून प्रति सेकंदाला ५६ हजार क्युसेकने एकाच वेळी पाणी बाहेर पडते. रविवारी पहाटे २ वाजता धरण १०० टक्के भारले. धरणाच्या ४५ पैकी ११ स्वयंचलीत दरवाजातून ८ हजार क्युसेकने पाण्याचा विर्सग सुरू होता. मात्र, पाऊस कमी झाल्याने सध्या १ हजार १७१ क्युसेकने पाण्याचा विर्सग सुरू आहे.
चौकट
भाटघर धरण मागील वर्षी २१ ऑगस्टला भरले होते. मात्र, पाऊस नसल्याने धरण २१ दिवस उशिराने भरले आहे. धरण भरल्याने ३ जिल्ह्यांतील ९ तालुक्यातील २ लाख ५० हजार हेक्टर शेतीला फायदा होणार आहे.
चौकट
पाणी पाहण्यास पर्यटकाची गर्दी
भाटघर धरण भरल्याने धरणाच्या मोऱ्यातून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. हे दृश्य पाहण्यासाठी भोर तालुक्यात व पडणाऱ्या पाण्याचे विहंगम दृश्य पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती.
फोटो : ब्रिटिशकालीन भाटघर धरण १०० टक्के भरले असून, धरणाच्या स्वयंचलीत धरणातून सुरू असलेला पाण्याचा विसर्ग. (छायाचित्र : इम्रान आतार)