राजगुरुनगर : चोरट्यांनी दिवसा घरात घुसून चाकूचा धाक दाखवून सुमारे चार लाख रुपये लांबवल्याची घटना (दि. १२ ) रोजी सिध्देश्वर नगरी कोर्टाचे पाठीमागे राजगुरूनगर (ता खेड ) येथे घडली. दिवसाढवळ्या घडलेल्या चोरीच्या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे.
याबाबत या घटनेबाबत खेडपोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी महिला व तिची आजी दुपारी साडेतीन वाजता घरात असताना घराची दरवाजाची बेल चोरट्यांनी वाजविली. २५ ते ३० वयोगटातील दोन चोरट्यांनी घरात प्रवेश करून त्यातील एका चोरट्याने हातात चाकु घेवुन फिर्यादीला तुझ्या घरात असलेले सर्व पैसे काढुन दे नाहीतर तुला मारुन टाकीन अशी भिती व धमकी दिली. घरातील हॉलमध्ये असलेल्या लाकडी कपाटात ठेवलेले रोख रक्कम चार लाख रुपये जबरीने काढून घेतले. फिर्यादीला जाताना म्हणाले तु पोलिसांना कळविले तर तुला मारून टाकू अशी धमकी दिली. या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक भारत भोसले करीत आहेत.