शहरं
Join us  
Trending Stories
1
Vinod Tawde: हे गँगवॉर असू शकते...; विनोद तावडे प्रकरणात उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला संशय
2
Vinod Tawde : भाजप नेते विनोद तावडे यांच्यावर निवडणूक आयोगाची कारवाई, पैसे वाटल्याच्या आरोपावरून FIR दाखल
3
“भाजप अन् विनोद तावडेंवर निवडणूक आयोगाने कठोर कारवाई करावी”: बाळासाहेब थोरात
4
Video - डान्स करतानाच नवरदेवाला आला हार्टअटॅक; वराती ऐवजी निघाली अंत्ययात्रा
5
विनोद तावडेंच्या डायरीत १५ कोटी रुपयांची नोंद; क्षितीज ठाकूर यांचा खळबळजनक आरोप
6
संपूर्ण महाराष्ट्रात २० नोव्हेंबरला सरकारी सुट्टी; शेअर बाजार-बँका बंद, पण...
7
...अन् शेवटी तावडे आणि ठाकूर एकाच गाडीत बसून गेले; चार तासांत नेमकं काय-काय घडलं?
8
एवढा पैसा आला कुठून? विनोद तावडेंच्या आरोपावरून सुप्रिया सुळेंचा सवाल
9
‘एक है तो सेफ है’ घोषणेवरून लालूप्रसाद यादवांची भाजपासह साधूसंतांवर टीका, म्हणाले...  
10
Vinod Tawde: विनोद तावडे प्रकरणात ९,९३,५०० रुपये रक्कम सापडली; निवडणूक आयोगाची माहिती
11
IPL 2025: मेगा लिलावाआधी १९ वर्षीय मराठमोळ्या खेळाडूची रंगली चर्चा, कोण आहे तो?
12
“गृहखात्याने पाळत ठेवली अन् विनोद तावडे जाळ्यात अडकतील याचा बंदोबस्त केला”; राऊतांचा दावा
13
Vinod Tawde: विनोद तावडे प्रकरण मिटले? हितेंद्र ठाकुरांसोबत एकत्र पत्रकार परिषद होती, पोलिसांनी रोखली
14
"महाराष्ट्रातील स्वाभिमानी जनता मत विकणार नाही’’, जयंत पाटील यांचा भाजपाला टोला   
15
कर्तव्यनिष्ठेला सलाम! स्वतःच्या जीवाची पर्वा न करता नर्सने १५ बाळांचा आगीतून वाचवला जीव
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'अखेर भ्रष्टयुतीचा कारभार उघडा पडला, विनोद तावडेंवर कारवाई झाली पाहिजे'; नाना पटोलेंची मागणी
17
आईवरील उपचार थांबवून त्यांनी...; श्रीनिवास पवारांचा अजित पवारांवर मोठा आरोप
18
घसरत्या बाजारात कुठे गुंतवणूक कराताहेत Mutual Fund हाऊस, कोणते आहेत ३ महिन्यांतील टॉप शेअर्स?
19
एक विवाह ऐसा भी! ११ रोपं आणि १ रुपया घेऊन नवरदेवाने बांधली लग्नगाठ; म्हणाला...
20
गौरी महालक्ष्मी योग: ७ राशींना भरपूर लाभ, शेअर बाजारातून नफा; उत्पन्न वाढेल, सुख-वैभव काळ!

भावासह पुतण्याला पेट्रोल टाकून पेटवले

By admin | Published: February 06, 2015 11:31 PM

जमीनीच्या वादातून सख्ख्या भावासह पुतण्याला पेट्रोल-डिझेल टाकून पेटवून दिल्याचा धक्कदायक प्रकार बारामती तालुक्यातील अंजनगाव येथे घडला.

बारामती : जमीनीच्या वादातून सख्ख्या भावासह पुतण्याला पेट्रोल-डिझेल टाकून पेटवून दिल्याचा धक्कदायक प्रकार बारामती तालुक्यातील अंजनगाव येथे घडला. शुक्रवारी मध्यरात्री दोन ते अडीच वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. यात दोघे जण गंभीर जखमी असून, पुण्यातील ससून रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. विशेष म्हणजे आरोपी सैन्यदलात नोकरीस आहे.जहांगीर नसीर मुलाणी (वय ३४), रोझम मुलाणी (वय १३) हे गंभीररीत्या भाजले आहेत. घर पूर्णपणे जळाले.तंटामुक्त समितीच्या माध्यमातून हा वाद मिटला होता. मात्र, शिवीगाळ केल्याच्या कारणावरून दोघा भावांमध्ये पुन्हा वाद झाला. या वादातून मारहाण केल्याचा राग मनात धरून आरोपी शौकत मुलाणी याने हा प्रकार केल्याची कबुली पोलिसांकडे दिली आहे. सख्खा भाऊ पक्का वैरी झाल्याच्या या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. आरोपी शौकत हा भारतीय सैन्यदलात नोकरीस आहे. त्याची सुट्टी संपली आहे. त्यामुळे तो उद्या (दि. ७) जाणार होता. मात्र, वाद मिटविताना भावाने केलेल्या शिवीगाळीचा राग मनात धरून त्याने हे कृत्य केले. दोघा भावांच्या वादात १३ वर्षांचा रोझम हा शालेय विद्यार्थी गंभीररीत्या भाजला आहे.गुरुवारी (दि. ५) गावातील प्रमुखांनी या दोघांमध्ये समेट घडवून आणण्याचा प्रयत्नही केला होता. मात्र, रात्री अचानक आरोपी शौकत याने गाढ झोपेत असताना जहांगीर मुलाणी यांच्या घरी जाऊन खिडकीतून जहांगीर व रोझम यांच्या अंगावर पेट्रोल-डिझेल ओतून त्यांना पेटवून दिले.या घटनेची माहिती मिळाल्यानंतर बारामती तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक चंद्रकांत कांबळे यांनी भेट देऊन माहिती घेतली. कांबळे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले की, ग्रामस्थांच्या पुढे मारहाण केल्याचा राग मनात धरून शौकत याने हे कृत्य केल्याची कबुली दिली आहे. दरम्यान, रात्री उशिरापर्यंत या प्रकरणी बारामती ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल नव्हता. पुणे येथे जबाब घेतल्यानंतर या प्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल होण्याची शक्यता पोलीस सूत्रांनी वर्तविली आहे. (प्रतिनिधी)४या आगीत घरातील वस्तू जळून खाक झाल्या आहेत. तसेच, अंगणातील ३ शेळ्यांचाही भाजून मृत्यू झाला. आग आटोक्यात आणण्यासाठी गावातील ग्रामस्थांनी शर्थीचे प्रयत्न केले; मात्र आग आटोक्यात येत नव्हती, त्यामुळे अखेरला बारामती नगरपालिकेच्या अग्निशामक दलाची गाडी बोलावण्यात आली होती.४अग्निशामक दलाच्या कर्मचाऱ्यांनी व ग्रामस्थांनी प्रसंगावधान राखून घरातील स्वयंपाकाचा भरलेला गॅस सिलिंडर बाहेर काढला. आग आटोक्यात आणली. त्यामुळे पुढील मोठा अनर्थ टळला. मात्र, या आगीत जहांगी इर मुलाणी यांच्या अनेक संसारोपयोगी वस्तू, कपडे, धान्य आदी जळून मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. जहांगीर नसीर मुलाणी, शौकत नसीर मुलाणी या दोघा भावंडांचा वडिलोपार्जित जमिनीवरून गेल्या अनेक वर्षांपासून वाद आहे. त्या वादातून सतत कुरबुर सुरू होती. त्यांच्यामध्ये समझोता घडवून आणण्याचा गावकऱ्यांनी प्रयत्न केला. अनेकदा किरकोळ स्वरूपाची भांडणे सुरू होती.