शेलपिंपळगाव (पुणे) : भोसे (ता. खेड) येथे जमीनीच्या वादातून भावकीतल्याच चौघांनी बहीण-भावाला बेदम मारहाण केली. या घटनेत भाऊ गंभीर जखमी झाला आहे. रविवारी (दि.४) रात्री ही घटना घडली. याप्रकरणी किरण दत्तात्रय होगजे (वय २९ रा. भोसे, खेड) यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरून चंद्रकांत दिनकर होगजे, महिला आरोपी, कार्तीक चंद्रकांत होगजे, निशीकांत चंद्रकांत होगजे (सर्व रा. भोसे, खेड) यांच्यावर गुन्हा दाखल केला असून चंद्रकांत याला पोलिसांनी अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व आरोपी यांच्यात जमिनीवरून वाद झाला होता. याचा राग मनात धरून आरोपींनी फिर्यादीची चुलत बहीण व तिच्या मुलीला मारहाण केली. यावेळी फिर्यादी त्यांना सोडविण्यासाठी गेले असता आरोपींनी काठीने, लोखंडी सळईने मारहाण केली. भांडणे सोडविण्यासाठी आलेल्या फिर्यादींचा सख्खा भाऊ व चुलत भाऊ यांनाही आरोपींनी मारहाण केली. यामध्ये फिर्यीदी हे गंभीर जखमी असून त्यांच्यावर एका खासगी रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरु आहेत.