सांगवी (बारामती): व्यवसायासाठी दिलेल्या पैशाच्या वादातून राहत्या घरात लहान भावाने थोरल्या भावाचा चाकूने मानेवर छातीवर वार करून खून केल्याची खळबळजनक घटना बारामती तालुक्यातील माळेगाव येथे घडली आहे.
पोलीस निरीक्षक किरण अवचर यांनी दिलेल्या माहितीनुसार कल्पेश अरुन धुळप (वय 26) वर्ष रा.तावरे पेट्रोलपंपामागे, अमरसिंह कॉलनी, बु(ता. बारामती जि.पुणे), असे खून झालेल्या थोरल्या भावाचे नाव आहे. तर खून केल्या प्रकरणी आरोपी मंथन अरुण धुळप (वय २३) याला पोलिसांनी अटक केली आहे.
याबाबत फिर्यादी आई सुरेखा अरुण धुळप, (वय ५०) व्यवसाय गृहीणी, रा.तावरे पेट्रोलपंपामागे, अमरसिंह कॉलनी, माळेगाव बु (ता. बारामती जि. पुणे), यांनी आरोपी मंथन अरुण धुळप (वय २३),तावरे पेट्रोलपंपामागे, अमरसिंह कॉलणी, माळेगाव बु (ता. बारामती जि.पुणे ) याच्या विरोधात माळेगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. शुक्रवारी (दि.२८) रोजी रात्री साडे नऊ वाजण्याच्या सुमारास हा धक्कादायक प्रकार समोर आला.
मोठा भाऊ कल्पेश याला आठ दिवसापुर्वी चप्पलच्या व्यवसायाकरीता १ लाख ४० हजार रुपये भांडवल दिले होते. त्यानंतर आठ दिवसांनंतर दिलेल्या भांडवलाचे काय केले असा जाब लहान भाऊ मंथनने मोठा भाऊ कल्पेशला विचारला होता. यावर कल्पेशने सदरचे पैसे शेअर मार्केटमध्ये गुंतवल्याचे सांगून आता माझ्या खात्यावर पैसे नाहीत मी नंतर पैसे देतो असे म्हटले. यानंतर अरोपी मंथन रागावून कल्पेशच्या अंगावर धावून गेला. यावेळी कल्पेश व मंथनच्यात मारहाण झाली. कल्पेशने हाताने बुक्याने छातीवर मारहाण केली. यावेळी आरोपी मंथनने रागातून घरातील कपाटातील चाकुने कल्पेशच्या मानेवर व छातीवर चाकुने जबर वार करुन त्याचा जागीच खून केला. यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. आरोपी मंथन यास वैद्यकीय तपासणी नंतर उपकारागृहात ठेवण्यात आले आहे. याबाबत सहायक पोलीस उपनिरीक्षक देवीदास साळवे अधिक तपास करीत आहेत.