इंदापूर (पुणे) : पूर्वीच्या वैमनस्यावरून करेवाडी (ता. इंदापूर) येथील २० वर्षे वयाच्या महाविद्यालयीन युवकाचा खून केल्याच्या आरोपावरून तिघांविरुद्ध इंदापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्रणव नानासाहेब करे (वय २०, रा.करेवाडी, ता. इंदापूर) असे मयताचे नाव आहे. राजकुमार पवार (रा.बाबा चौक, इंदापूर), इरफान शेख (रा.इंदापूर),फरदिन मुलाणी (रा वडापुरी, ता.इंदापूर) अशी आरोपींची नावे आहेत. प्रणवचा भाऊ प्रतीक नानासाहेब करे याने या प्रकरणी फिर्याद दिली आहे.
प्रणव यास आरोपी जीवे ठार मारण्याची धमकी देत होते. फिर्यादी त्यांना विचारणा करण्यास गेला. त्यावेळी त्याला ही धमकावण्यात आले होते. काल (दि.५) आरोपींनी प्रणव याचा पाठलाग करून कशाने तरी मारहाण करून त्याला जीवे ठार मारले आहे,असे दिलेल्या फिर्यादीत प्रतीक करे याने म्हटले आहे. फौजदार दाजी देठे अधिक तपास करत आहेत.