शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत राडा! ठाकरे-शिंदे गटाचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले, मध्यरात्री वातावरण तापलं!
2
माझ्याकडे महाराष्ट्राचे सत्यात उतरणारे स्वप्न, माझा कम्फर्ट भाजपसोबत; राज ठाकरेंनी मांडली रोखठोक भूमिका
3
आजचे राशीभविष्य - १३ नोव्हेंबर २०२४, लाभदायी दिवस, नोकरीत यश मिळेल, घरातील वातावरण सुखद राहील
4
झारखंडमध्ये आज मतदान,  १० राज्यांत होणार पोटनिवडणूक
5
मराठा समाजाची कांड्यांवर मोजण्याइतकी आहेत मतं; भाजपच्या बबनराव लोणीकरांचे वादग्रस्त वक्तव्य
6
आजचा अग्रलेख: भुजबळ ‘सीएम’ का झाले नाहीत?
7
शिवाजी पार्कवर उद्धवसेना, मनसेची सभा होणार?; नगरविकास खात्याच्या निर्णयाकडे लक्ष
8
जगातले दुश्मन एकत्र येतात तर आम्ही एकत्र येण्यावर चर्चा तर हवी; 'लोकमत'च्या मुलाखतीत राज ठाकरेंचं वक्तव्य
9
भाजपच्या बंडखोर उमेदवाराचा शिंदेसेनेच्या उमेदवाराला पाठिंबा
10
उठा उठा थंडी आली, स्वेटर घालायची वेळ झाली; मुंबई २० अंशांवर, राज्यात थंडीचा कडाका होतोय सुरू!
11
२० वर्षांत मतदार नेमके कुणाकडे गेले? २००४ ते २०१९ मध्ये काय घडलं?; जाणून घ्या आकडेवारी
12
२ हजारांहून अधिक मतदार सध्या कामानिमित्त परदेशात
13
मतदान केंद्रांवर ‘सबकुछ महिला’: मतदान वाढणार?; राज्यात ४२६ केंद्रांवर महिला अधिकारी, कर्मचारी सज्ज
14
महागडी फी भरून शाळेत काय मिळते? - निराशा!
15
दिव्यांग, ज्येष्ठांना मतदानाला आणण्यासाठी विशेष सोय; सक्षम ॲपवर नाव नोंदवण्याचे आवाहन
16
"कुणाला काय विचारावं हे पण उद्धव ठाकरेंना माहिती नाही"; राज ठाकरेंची बोचरी टीका
17
"समजूत काढायला गेले अन् तिथेच बसले"; येवल्यात भुजबळांवर शरद पवारांचा हल्लाबोल
18
डोनाल्ड ट्रम्प यांनी कुणाला बनवलं NSA? नाव जाणून पाकिस्तानलाही धढकी भरेल; भारतासाठी आहेत खास!
19
किरकोळ महागाई RBI च्या हाताबाहेर गेली; रेपो रेटमध्ये कपात होणे शक्य नाही?
20
महाराष्ट्रातील निवडणुकीसाठी काँग्रेसचा 'मेगा प्लॅन'! पुढच्या ६ दिवसांत काय करणार? २ गोष्टींवर असेल सर्वधिक फोकस

बीएसएनएलमध्ये मराठी प्रतीक्षेतच

By admin | Published: March 17, 2016 3:23 AM

भारत संचार निगम (बीएसएनएल) या दूरसंचार सेवा पुरविणाऱ्या शासकीय नियंत्रण असलेल्या कंपनीमध्ये मराठीला सापत्न वागणूक मिळत असल्याचा अनुभव ग्राहक घेत आहेत.

पुणे : भारत संचार निगम (बीएसएनएल) या दूरसंचार सेवा पुरविणाऱ्या शासकीय नियंत्रण असलेल्या कंपनीमध्ये मराठीला सापत्न वागणूक मिळत असल्याचा अनुभव ग्राहक घेत आहेत. ‘बीएसएनएल’च्या १९७ या हेल्पलाइनशी (डिरेक्टरी एन्क्वायरी) संपर्क साधल्यानंतर तिथे मराठीतून पर्याय उपलब्ध असतानाही अनेकदा हिंदी भाषिक प्रतिनिधीशी संवाद साधावा लागत आहे. दूरसंचार क्षेत्रात पहिल्यांदा देशातील कोट्यवधी ग्राहकांपर्यंत पोहोचणारी बीएसएनएल ही कंपनी आहे. केंद्र सरकारचे नियंत्रण असलेल्या या कंपनीने दूरध्वनी आणि मोबाईलसेवेच्या माध्यमातून देशभरातील विविध भाषिक ग्राहकांना आपलेसे केले. इतर खासगी कंपन्यांशी स्पर्धा करताना कंपनीने नवीन तंत्रज्ञानाच्या माध्यमातून विविध बदलही केले. ग्राहकांसाठी विविध हेल्पलाइन सुरू केल्या. त्यामध्ये १९७ या हेल्पलाइनचाही समावेश आहे. बीएसएनएलचे ग्राहक असलेल्या संस्था किंवा व्यक्तींचे दूरध्वनी क्रमांक, पत्ते हवे असलेल्या या क्रमांकाशी संपर्क साधल्यानंतर ते उपलब्ध करून दिले जातात. अनेक ग्राहक या सुविधेचा लाभ घेतात. पण या सुविधेमध्ये मराठी भाषेला दुय्यम स्थान मिळत असल्याचे दिसून आले आहे.मराठी भाषेला राजभाषेचा दर्जा मिळण्यासाठी प्रयत्न सुरू असताना एखाद्या सरकारी नियंत्रण असलेल्या संस्थेकडून मराठीची उपेक्षा होत आहे. बीएसएनएलच्या १९७ या हेल्पलाइनशी संपर्क साधल्यानंतर लगेचच हिंदी, इंग्रजी व मराठी भाषा निवडण्यासाठी अनुक्रमे १, २ आणि ३ क्रमांक निवडण्यास सांगतात. त्यानुसार मराठी भाषेची निवड केल्यानंतर हेल्पलाइन प्रतिनिधीला दूरध्वनी जोडला जातो. हिंंदी भाषिक प्रतिनिधींना नीट मराठी समजत नसल्याने नेमक्या कुठल्या संस्था क्रमांक किंवा पत्ता हवा आहे, हे कळत नाही. त्यांना संबंधित संस्थेच्या नावाची इंग्रजी अक्षरे सांगून ते नाव तयार करीत होते. त्यानंतर पुढील शोधाशोध सुरू होत होती. यामध्ये वेळेबरोबरच ग्राहकांना मनस्तापही सहन करावा लागत आहे. याविषयी संबंधित प्रतिनिधींकडेच विचारणा केली असता एकाने मराठी हेल्पलाइनवर दुसऱ्या ग्राहकाचे संभाषण सुरू असल्याने इकडे जोडला गेला असावा, असे सांगितले, तर काहींनी त्याबाबत बोलण्यास असमर्थता दर्शविली.सजग नागरिक मंचचे जुगल राठी यांनाही हेल्पलाइनवरही असाच अनुभव आला. मराठी पर्याय निवडूनही त्यांना हिंदीतून प्रतिनिधीशी संवाद साधावा लागला. पुण्यातील एका संस्थेचा दूरध्वनी मिळविण्यासाठी त्यांना संपर्क साधला होता. संबंधित प्रतिनिधीला त्या संस्थेचा क्रमांक न मिळाल्याने त्याने थेट एका खासगी सेवा पुरविणाऱ्या संस्थेचा क्रमांक दिल्याचे राठी यांनी सांगितले.हेल्पलाइनवर मराठीला सापत्न वागणूक मिळत असल्याबाबत पुण्यातील बीएसएनएल कार्यालयाशी संपर्क साधल्यानंतर ही हेल्पलाइन डेहराडून येथील कॉल सेंटरमधून सुरू असल्याचे सांगण्यात आले. त्याचे संपूर्ण नियंत्रण तेथूनच होते. याबाबतची तक्रार मेलद्वारे पाठविल्यास त्यांच्याकडे ही तक्रार दिली जाईल, असेही अधिकाऱ्यांनी सांगितले.मराठी भाषेची निवड करूनही अनेकदा हिंदीतून संवाद सुरू झाल्याचा अनुभव येत आहे. ‘लोकमत प्रतिनिधी’ने या क्रमांकावर सहा वेळा संपर्क साधला. त्यातील केवळ दोन वेळा मराठी भाषिक प्रतिनिधीशी दूरध्वनी जोडला गेला. इतर चार वेळा हिंदी भाषिक प्रतिनिधीशी संवाद साधावा लागला.