शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपची मोठी घोषणा! मुंबईत मनसेच्या या उमेदवाराला पाठिंबा; पूर्ण ताकदीने प्रचार करणार
2
लाडक्या बहि‍णींना महिन्याला ₹2100, शेतकऱ्यांना कर्जमाफी अन्..CM शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
3
मुंब्र्यात छत्रपती शिवाजी महाराजांचे मंदिर उभारा; फडणवीसांचं उद्धव ठाकरेंना आव्हान
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला; सतेज पाटलांसमोर शाहू महाराजांची घोषणा
5
IPL २०२५ च्या मेगा लिलावाचे शहर ठरले; या तारखांना सौदीत २०४ खेळाडू निवडले जाणार
6
Uddhav Thackeray: शिंदेंना वाटले तर चिन्ह द्या, पण शिवसेना माझीच राहणार; उद्धव ठाकरेंचे मोठे वक्तव्य
7
मावळात राज ठाकरेंनी मोठा निर्णय घेतला; अजित पवार गटाच्या बंडखोर उमेदवाराला पाठिंबा जाहीर
8
गुजरातच्या आणंदमध्ये बुलेट ट्रेनचा पूल कोसळला; दोन मजुरांचा मृत्यू, एक जखमी
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "महायुतीची लाडकी बहीण योजना तात्पुरती, आम्ही योजना कायम ठेवणार"; विश्वजीत कदमांचा विरोधकांवर हल्लाबोल
10
महाराष्ट्रापूर्वी झारखंडमध्ये इंडिया आघाडीचा जाहीरनामा; ७ गॅरंटी, महिलांना पैसे देणार
11
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये महिला बॉक्सरकडून फसवणूक; गोल्ड जिंकलं पण पुरुष असल्याचे उघड झालं
12
कोल्हापूर उत्तरमधून अपक्ष उमेदवार राजेश लाटकर अर्ज मागे घेणार होते, तितक्यात...
13
महाराष्ट्रात कुठे कोणाची ताकद? मुंबई, विदर्भ, मराठवाड्याचे राजकीय समीकरण काय? पाहा...
14
शाहू महाराज खासदारकीचा राजीनामा देणार? सतेज पाटलांनी अपमान केल्याच्या अफवांवर छत्रपतींचे निवेदन...
15
उत्तर महाराष्ट्रातील ११ मतदारसंघात काट्याची लढत; कुठे कुठे बंडखोरांचं आव्हान?
16
ओडिशात धावत्या ट्रेनवर गोळीबार; प्रवाशांमध्ये प्रचंड घबराट, पाहा व्हिडिओ
17
"...तर हार्ट द्या!"; राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीला सुरुवात होताच चर्चेत आली इवांका; काय घडलं?
18
Maharashtra Election: राजघराण्यातील तीन व्यक्ती पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात आमने-सामने
19
देशातील अशी 'ही' १४ गावं; जिथले ५००० मतदार महाराष्ट्र अन् तेलंगणातही करतात मतदान
20
धक्कादायक! तांत्रिकाच्या सांगण्यावरून संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त; वाराणसीत चार जणांच्या हत्येनंतर आत्महत्या

अनुदानाअभावी बीएसएनएलच्या ६ केंद्रांची बत्ती गुल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2019 1:06 AM

बारामती तालुक्यातील प्रकार : वीजबिलापेक्षा डिझेलवर होतोय दुप्पट खर्च

बारामती : बीएसएनएलच्या तालुक्यातील जवळपास २१ ‘एक्स्चेंज स्टेशन’पैकी बारामती, कºहावागज, कºहाटी, शिर्सुफळ, जळगाव कडेपठार, उंडवडी या ६ ठिकाणचा वीजपुरवठा बिल न भरल्याने बंद करण्यात आला आहे. यामुळे हे सर्व केंद्र डिझेल जनित्रांवर सुरू असून मोठ्या प्रमाणात खर्च वाढल्याने तालुक्यातील सेवा खोळंबली आहे. महिन्याला येणाऱ्या वीजबिल्याच्या दुप्पट खर्च हे जनित्र चालवण्यावर होत आल्याने हे केंद्र डबघाईला येणार आहेत. केंद्र सरकारकडून अनुदान न मिळाल्याने ही अवस्था झाल्याची माहिती पुढे आली आहे.

बारामती, कºहावागज, कºहाटी, शिर्सुफळ, जळगाव कडेपठार, उंडवडी या ६ ठिकाणचा वीजपुरवठा बिल न भरल्याने बंद करण्यात आला आहे. येथील मोबाइल साइटवर इंजिनाची व्यवस्था असल्याने त्याचा वापर दिवसभर करावा लागत आहे. सकाळी १० ते सायं. ६ किंवा जास्त वेळ इंजिन चालू ठेवावे लागते. त्यासाठी महिन्याला ५८० लिटर डिझेल मिळते. मिळालेला ५८० लिटर डिझेलचा साठा महिन्याच्या सुरुवातीला ९ तारखेलाच संपला आहे. उर्वरित दिवसांत करायचे काय, असा प्रश्न बीएसएनएलच्या अधिकाºयांना पडला आहे. त्यासाठी येथील अधिकाºयांनी पेट्रोलपंप मालकाला विनंती करून २०० लिटर डिझेल उधार आणून काम चालू ठेवले आहे.

बारामती न्यायालय परिसरातील केंद्राला ७० लिटर, उंडवडी येथील केंद्राला १२५ लिटर, जळगाव कप येथील केंद्राला ६० लिटर, एमआयडीसी येथील केंद्राला ४८० लिटर, शिर्सुफळ ४५ लिटर डिझेल महिन्यासाठी मंजूर आहे. मात्र, वीजबिल न भरल्याने हे सर्व केंद्र डिझेल जनित्रांवर सुरू असल्याने केवळ ९ दिवसांतच सर्व डिझेल संपल्याने यापुढे काय करायचे, असा प्रश्न या केंद्रापुढे निर्माण झाला आहे.

विद्युत विभागाचे वीजबिल भरण्यासाठी दिल्ली येथून अनुदान मुंबई येथील सर्कल आॅफिस येथे येते. त्यानंतर मुंबई आॅफिस येथून महाराष्ट्रातील सगळ्या ठिकाणची वीजबिले भरली जातात; पण या महिन्यात हे अनुदान दिल्लीवरून येण्यास अडचणी येत आहेत.तालुक्यातील २१ एक्स्चेंज साइटवर १५ कर्मचारी आहेत. त्यामुळे ६ एक्स्चेंज साईटवर ६ लोकांची गरज आहे. अपुºया कर्मचाºयांअभावी सध्या या ६ साइटवर कार्यरत असणाºया कर्मचाºयांची दमछाक होत आहे. तसेच भिगवण, शेटफळ गढे, मानकरवाडी, येथेदेखील हीच समस्या आहे. वीजबिलाच्या दुप्पट खर्च डिझेलवर होत आहे. वीजपुरवठा बंद असल्याने ग्राहकांना सेवा व्यवस्थित मिळत नाही. तसेच ग्राहक वेळेत बिल भरत असूनदेखील सेवा मिळत नाही. बाजारात सध्या अनेक खासगी कंपन्या आहेत. त्यामुळे या स्पर्धेत तग धरण्यासाठी चांगली सेवा देणे गरजेचे आहे.डिझेल उधार आणले आहे...आम्हाला अनुदान येते, त्याप्रमाणे आम्ही थकीत बिले भरत आहोत. तसेच, सेवा पूर्ववत करण्याचा प्रयत्न करत आहोत. दर महिन्याला या २१ एक्स्चेंज साइटसाठी ३८,००० हजार रुपये एवढे अनुदान येते. पण या महिन्यात फक्त १५,००० हजार रुपये आले आहेत. डिझेलचे २३००० हजार देणे बाकी आहे तसेच आता विनंती करून पंप मालकाकडून २०० लिटर डिझेल उधार आणले आहे, अशी माहिती बीएसएनएलचे उपमंडल अभियंता एस. ए. भगत यांनी ‘लोकमत’शीबोलताना सांगितले.