बावडा : बावडा येथे आज बौद्ध पौर्णिमा (जयंती) साधेपणाने साजरी करण्यात आली. या वेळी जगावर आलेले कोरोनाचे महासंकट कायम हटविण्यासाठी बुद्धचरणी सामूहिक साकडे घालण्यात आले.
येथील लुम्बिनी बुद्धविहारात संचालक महादेव घाडगे, तसेच शिवाजी एज्युकेशन सोसायटीचे सचिव उमेश सूर्यवंशी यांनी बुद्धांच्या प्रतिमेस पुष्प वाहिले. या वेळी जयंतीमहोत्सव समितीचे संस्थापक ज्येष्ठ पत्रकार रमाकांत तोरणे, ज्येष्ठ विधिज्ञ समीर टिळेकर, इंदापूर पं. स. चे माजी सदस्य अशोक घोगरे, दलित पँथरचे लहुजी गायकवाड, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष लक्ष्मण गायकवाड आदी उपस्थित होते.
या ठिकाणी गावचे सरपंच किरण पाटील, उपसरपंच नीलेश घोगरे आदींनी भेट देऊन बुद्ध प्रतिमेस वंदन केले. या कार्यक्रमाचे नियोजन कोरोनाचे सर्व नियम पाळून करण्यात आले होते. उपस्थितांचे स्वागत अॅड. कमलाकांत तोरणे यांनी केले. बौद्धाचार्य गौतम जगताप यांनी बुद्धवंदना घेतली. या वेळी संपूर्ण जागावर आलेले कोरोनाचे महाभयंकर संकट कायमस्वरूपी टळावे, अशी बुद्धचरणी प्रार्थना करण्यात आली. कार्यक्रमाचे संयोजन जयंतीमहोत्सव समितीचे अध्यक्ष अण्णासाहेब तोरणे यांनी केले, तर आभार महादेव रूपचंद कांबळे यांनी मानले.
————————————————
फोटो ओळी : बावडा येथील लुम्बिनी बुद्धविहारात बुद्ध पौर्णिमेनिमित्त भगवान गौतम बुद्धास पुष्प वाहून जयंती साधेपणाने साजरी करण्यात आली.
२६०५२०२१-बारामती-०१
————————————————