पुणे :पुणे महापालिकेचा २०२३-२४ चा अर्थसंकल्प शुक्रवारी (दि. २४) दुपारी १ वाजता सादर हाेणार आहे. आयुक्त विक्रम कुमार यांनी स्थायी समितीला ताे सादर करतील. नगरसेवक नसताना हा अर्थसंकल्प सादर हाेत आहे. गेल्या वर्षीपासून कुठलीही यादी नाही. त्यामुळे आयुक्त वास्तववादी बजेट सादर करणार का, असा सवाल उपस्थित केला जात आहे.
दरम्यान, हे अर्थसंकल्प फेब्रुवारी महिन्यात सादर केले जाणार होते. कसबा विधानसभा पोटनिवडणुकीच्या आचारसंहितेमुळे हे अर्थसंकल्प सादर करता आले नाही. आता २४ मार्च रोजी सादर केले जाणार आहे.
आयुक्त विक्रम कुमार यांनी पुणे महापालिकेच्या २०२२-२३चा अर्थसंकल्प ८ हजार ५९२ कोटींचे सादर केले होते. त्यामध्ये ४ हजार ८८१ कोटींची महसुली कामे, तर ३ हजार ७१० कोटी भांडवली प्रस्तावित केली होती. २०२१-२२ आयुक्तांनी ७ हजार ६५० कोटीचे अर्थसंकल्प तयार केले होते. यात हजार कोटीची वाढ केली होती. स्थायी समितीच्या अर्थसंकल्पामध्ये २२२ कोटींची वाढ आयुक्तांनी केली होती.
आयुक्तांनी बजेट सादर केल्यानंतर स्थायी समिती अध्यक्षांना बजेट सादर करता आले नव्हते. त्यांचा कालावधी संपला होता. पुढे आयुक्तांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पावरच अंमलबजावणी करण्यात आली. त्यानंतर पालिका प्रशासक म्हणून आयुक्त विक्रम कुमार यांना याच पद्धतीने दुसरे अर्थसंकल्प सादर करण्याची संधी मिळाली आहे.