पुणे चक्राकार मार्गासाठी भूसंपादनाचे काम हाती घेण्यात येईल त्यामुळे पुणे शहरातील वाहतूक समस्ये वर मात करता येईल. पुणे नाशिक रेल्वे प्रकल्पाला चालना, पुण्यात आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ स्थापन करणे, अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकारी, कर्मचारी तसेच औषध व्यावसायिकांना बदलत्या कायद्यांची माहिती देण्यासाठी मोशी येथे प्रशिक्षण केंद्र स्थापण्याचा निर्णय शहराच्या विकासाच्या दृष्टीने आनंदाची बाब आहे .
- महेंद्र पितळीया, सचिव पुणे व्यापारी महासंघ
---
बळीराजा केंद्रित मात्र व्यापारी, उद्योजकांना डावलणारा
उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी विधानसभेत सन २०२१-२२ साठी सादर केलेल्या अर्थसंकल्पाबाबत वन नेशन वन टॅक्स असे धोरण असल्यामुळे व्यवसाय कर रद्द करावा, तसेच मार्केट सेस रद्द करावा अशी मागणी शासनाकडे केली होती. वरील मागणी पूर्ण होईल अशी अपेक्षा होती. मात्र तसे काहीच घडले नाही. पेट्रोल व डिझेलची भाव वाढ झाली की, वाहतूक व्यवस्था महाग होते, पर्यायाने महागाई वाढते, असं असतानाही पेट्रोल व डिझेलच्या करात कपात केली नाही, सर्वसामान्य माणसाला याचा भुर्दड बसणार आहे.
- पोपटलाल ओस्तवाल, अध्यक्ष दि पूना मर्चंट चेंबर
--
राज्याचा २०२१-२२ या आर्थिक वर्षाचा १०,२२६ कोटी रुपयांचा तुटीचा अर्थसंकल्प उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री, अजित दादा पवार यांनी सादर केले. या अर्थसंकल्पामध्ये केंद्र सरकारने जे भव्य प्रकल्प सुरु केलेले आहेत तेच प्रकल्प या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून पुढे नेण्याचा प्रयत्न सध्याचे सरकार करीत आहे असे दिसते. तसेच काही ठराविक भागाच्याच विकासाच्या घोषणा या अर्थसंकल्पात केलेल्या दिसत आहेत.
- प्रवीण चोरबेले, माजी अध्यक्ष दि पूना मर्चंट चेंबर