आंबेठाण : औद्योगिक वसाहतीत वाढत असलेल्या कारखानदारांना विश्वासार्हता निर्माण होईल, असे पोषक वातावरण तयार करण्यासाठी संबंधित सर्व प्रशासकीय यंत्रणेने दक्षता घेतली पाहिजे, असे आवाहन पुण्याचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी सोमवारी (दि.७) केले. येथे आयोजित करण्यात आलेल्या विविध कंपनीच्या अधिकारी व संबंधित विभागाच्या बैठकीत ते बोलत होते.चाकण औद्योगिक औद्योगिक क्षेत्रात कारखानदारांना उद्योग व्यवसाय चालविताना कुठल्याही अडचणी येता कामा नये, यासाठी औद्योगिक क्षेत्रात विश्वासाचे वातावरण तयार करण्यासाठी संबंधित व प्रशासकीय यंत्रणेने दक्षता घेणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.यावेळी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, आमदार सुरेश गोरे, खेडचे प्रांताधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, चाकणचे पोलीस निरीक्षक मनोजकुमार यादव आदींसह एमआयडीसी विभाग, वीज वितरण, कामगार आयुक्तालय, महसूल विभागाचे अधिकारी उपस्थित होते.यावेळी एमआयडीसीमधील काही समस्यांच्या संदर्भात वीज वितरण, महसूल प्रशासन, एमआयडीसीचे अधिकारी, कामगार कार्यालयाचे अधिकारी आणि पोलीस प्रशासनाला जिल्हाधिकारी यांनी महत्त्वाच्या सूचना दिल्या. बैैठकीला सुमारे दोनशेहून अधिक कंपन्यांचे प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते. समस्यांबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित विभागाच्या अधिकाºयांनातत्काळ समस्या निवारण करण्याचे आदेश दिले.राष्ट्रीय महामार्गाच्या रस्त्यांच्या दुरुस्तीची मागणीचाकण एमआयडीसी लगतच्या चाकण तळेगाव आणि नाशिक फाटा ते चाकण दरम्यानच्या रस्त्यांची अवस्था दयनीय झाली असून मोठ्या प्रमाणावर वाहतूककोंडी आणि अपघातांचा सामना करावा लगत असल्याची तक्रार यावेळी उद्योगांच्या प्रतिनिधींनी केली. यावर खासदार शिवाजीराव आढळराव आणि आमदार सुरेश गोरे यांनी संबंधित दोन्ही रस्त्यांची कामे तातडीने पूर्ण व्हावीत, यासाठी सातत्याने शासनाकडे पाठपुरावा सुरू असून लवकरच दोन्ही रस्त्यांची कामे मार्गी लागतील, असे आश्वासन दिले.स्थानिकांना नोक-यांत प्राधान्य द्याखासदार व आमदारांनी, आपल्या कारखान्यात नोकºया देताना स्थानिक तरुणांना प्रामुख्याने प्राधान्य दिलेााहिजे. स्थानिकांना डावलून इतरांनाप्राधान्य देण्यात येत असल्याचा अनुभव आला आहे. पुढील काळात या बाबतदक्षता घेण्याची मागणी कंपन्यांच्या प्रतिनिधींकडे केली.
उद्योगवाढीसाठी विश्वासार्हता निर्माण करा - नवल किशोर राम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2018 2:03 AM