शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचारसभेहून परतत असताना वाहनावर दगडफेक; अनिल देशमुख जखमी, उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
2
“अजितवर अन्याय, तो काय सोसतोय हे मला माहिती आहे”; आई आशाताई पवारांचा पत्राद्वारे संवाद
3
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...
4
“...तर उद्या सकाळी निवडणुकीतून माघार घेईन”; दिलीप वळसे पाटलांचे खुले आव्हान
5
'ही राष्ट्रीय आणीबाणी', मुख्यमंत्री आतिशी यांनी दिल्लीतील प्रदूषणाचे खापर केंद्रावर फोडले
6
हो..., मी सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले, पण...; सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या
7
गोरगरीब धारावीकरांना पक्के घर मिळू नये हीच राहुल गांधींची इच्छा; भाजपाचा घणाघाती आरोप
8
याला म्हणतात पैशांचा पाऊस...! ₹4 चा शेअर 4 महिन्यांत ₹282631 वर पोहोचला, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
9
मुंबई पोलिसांना मोठे यश! लॉरेंस बिश्नोईच्या भावाला अमेरिकेत अटक; भारतात आणणार
10
'छोटा पोपटने काँग्रेसला बरबाद केले', राहुल गांधींच्या 'सेफ' विधानावर भाजपचा पलटवार
11
मणिपूरमध्ये कोकोमीचे मोठे प्रदर्शन, सरकारी कार्यालयांना टाळे; आता सात जिल्ह्यांत इंटरनेट बंद करण्यात
12
“खरगेंच्या गावात सोयाबीनला ३८०० चा दर, काँग्रेस निवडणुकांनंतर आश्वासन विसरते”: फडणवीस
13
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'हसन मुश्रीफ गाडला जाणार', शरद पवारांसाठी बहीण सरोज पाटील मैदानात, विरोधकांवर हल्लाबोल
14
ड्रग्स सेवन केल्याप्रकरणी न्यूझीलंडच्या गोलंदाजांवर बंदी; सचिन-सेहवागची घेतली होती विकेट
15
“लोकांचे प्रश्न सोडवायची धमक, पुढच्या पिढीची गरज, युगेंद्रला निवडून द्या”: शरद पवार
16
हुश्श... उमेदवारांच्या कॉल, जाहिरातींनी मतदारांना भंडावून सोडलेले; अखेर प्रचार संपला, आता...
17
“२ लाखांच्या लीडने विजयी होतील, बारामतीकरांनी ठरवलेय की अजितदादांना CM करायचे”: जय पवार
18
ओवेसींचा मोठा दावा...! म्हणाले, "भारतात बसून ट्रम्प यांना जिंकून दिलं..."; CM योगींनाही खुलं आव्हान
19
'उद्धव ठाकरे सत्तेसाठी काँग्रेसच्या मांडीवर बसले', शेवटच्या प्रचारसभेत जेपी नड्डांचे टीकास्त्र
20
“जनताच महायुतीला सत्तेतून खाली खेचेल, लोकसभेनंतर विधानसभेला मविआला विजयी करा”: खरगे

अभिहस्तांतरण न करून दिल्याने बिल्डरविरुद्ध गुन्हा

By admin | Published: November 17, 2016 4:32 AM

बिल्डर मनोज अगरवाल व कमलाबाई गर्ग यांच्याविरुद्ध मोफा अ‍ॅक्ट अन्वये विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पुणे : टिंगरेनगर येथील अक्षय हेरिटेज को-आॅपरेटिव्ह हौसिंग सोसायटीच्या सभासदांना कन्व्हीन्स डीड (अभिहस्तांतरण पत्र) करून न दिल्याप्रकरणी बिल्डर मनोज अगरवाल व कमलाबाई गर्ग यांच्याविरुद्ध मोफा अ‍ॅक्ट अन्वये विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अक्षय हेरिटेज कोआॅपरेटिव्ह सोसायटीचे अध्यक्ष राजू औटी यांनी याप्रकरणी तक्रार दिली आहे. बिल्डरने सोसायटीच्या स्वच्छतागृहाच्या जागेत अनधिकृतपणे व्यापारी गाळे बांधले, याप्रकरणी महापालिकेकडे तक्रार करण्यात आल्यानंतर, पालिकेने कारवाई करून ते अनधिकृत बांधकाम पाडून टाकले. मात्र, बिल्डरने पुन्हा त्याठिकाणी बांधकाम केले. करारानुसार बिल्डरने सोसायटीला अभिहस्तांतरण पत्र करून देणे आवश्यक होते, मात्र त्याने हे अभिहस्तांतरण करून देण्यास टाळाटाळ केली. फ्लॅटच्या रचनेत बदल करताना सोसायटीची कोणतीही परवानगी घेतली नाही, अशी तक्रार विश्रांतवाडी पोलिसांकडे करण्यात आली होती. त्यानुसार मोफा अ‍ॅक्ट १९६३ अन्वये पोलिसांनी बिल्डरविरुध्द गुन्हा दाखल केला आहे.महापालिकेने सोसायटीचा मंजूर केलेला अंतिम मंजूर प्लॅन मिळण्यासाठी पालिकेकडे अर्ज केला असता, रेकॉर्ड विभागात सदर प्रकरणाचा आढळ होत नसल्याचे लेखी उत्तर देण्यात आले आहे, त्याबाबतही राजू औटी यांनी शंका उपस्थित केली आहे.