पुणे : रविवारी रात्री 10.30 च्या सुमारास पुण्यातील घाेरपडी पेठ येथील एका जुन्या वाड्याचा काहीसा भाग काेसळला. याची माहिती मिळताच तातडीने अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. तसेच पहापालिकेचे कर्मचारी देखील घटनास्थळी दाखल झाले. वाड्यातील नागरिकांना इतरत्र हलवून वाडा रिकामा करण्यात आला. तसेच आज सकाळी वाड्याचा धाेकादायक भाग काढून टाकण्याचे काम महापालिकेकडून सुरु करण्यात आले. अग्निशमन दलाने दिलेल्या माहितीनुसार पुण्यातील घाेरपडी पेठ येथील एका जुन्या वाड्याच्या एका भिंतीचा भाग रविवारी रात्री 10.30 सुमारास काेसळला. यात काेणीही जखमी झाले नाही. वाड्याचे बांधकाम लाकूड आणि मातीचे हाेते. वाड्याचा भाग काेसळला तेव्हा वाड्यात तीन ते चार कुटुंबे हाेती. त्यांना अग्निशमन दलाच्या जवानांनी सुरक्षितस्थळी हलवले. वाडा जुना असल्याने महापालिकेने त्याला धाेकादायक घाेषित केले हाेते. आज सकाळी महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी वाड्याचा धाेकादायक भाग पाडण्यास सुरुवात केली आहे.
पुण्यात वाडा नाही, वाड्याचा छाेटासा भाग काेसळला
By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2019 5:55 PM