पौड पंचायत समिती येथे सन २०२०-२१ साठीच्या शिष्यवृत्ती परिक्षेकरिता शिक्षकांकरिता मार्गदर्शन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी दोन गुणवंत शिक्षकांना बुलेट गाड्या व एका शिक्षिकेला ऍक्टिवा गाडी भेट देण्यात आली. यामध्ये पिरंगुट शाळेचे शिक्षक रियाज शेख, झोळ यांना बुलेट तर हिंजवडी शाळेच्या शिक्षिका शोभा कळमकर यांना ऍक्टिवा गाडी भेट देण्यात आली.
यावेळी पौड पंचायत समितीचे सभापती पांडुरंग ओझरकर, गटविकास अधिकारी संदीप जठार,गट शिक्षण अधिकारी माणिक बांगर,माजी सभापती व राष्ट्रवादी मुळशी तालुका अध्यक्ष महादेव कोंढरे यांनी कार्यशाळेत सहभागी झालेल्या शिक्षकांना मार्गदर्शन केले. यावेळी जिल्हा नियोजन समिती सदस्य अमित कंधारे, भोर विधानसभा राष्ट्रवादी युवक काँग्रेस अध्यक्ष प्रवीण धनवे, उपसभापती विजय केदारी आदी उपस्थित होते. कार्यशाळेत शिरूर तालुक्यातील तज्ञ शिक्षक अनिल पलांडे व घोडके यांनी मार्गदर्शन केले. विस्तार अधिकारी सचिन लोखंडे यांनी आभार मानले .
--
०८पौड शिक्षक बुलेट भेट
फोटो ओळी :शिष्यवृत्ती धारक विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांना बुलेट व ऍक्टिवा गाडी भेट देताना सभापती पांडुरंग ओझरकर