दावडी : बैलगाडा शर्यतीवरील जर न्यायालीन बंदी उठवली नाही तर येत्या मंगळवारी (दि. १५) न्यायालयीन बंदी झुगारून बैलगाडा घाटात पळवू, असा इशारा खेड तालुका बैलगाडाचालक-मालक संघटनेने दिला आहे.राज्यात बैलगाडा शर्यतीच्या न्यायालयीन बंदीला आज चार वर्षे पूर्ण झाली आहेत. बैलगाडा सुरू करण्यासाठी बैलगाडामालकांची न्यायालयीन लढाई सुरू आहे. मात्र बैलगाडामालकांना शर्यती सुरू होण्याची परवानगी मिळाली नाही. राजगुरुनगर येथे आज खेड, आंबेगाव, मावळ, हवेलीत बैलगाडामालकांनी काळा दिवस पाळला. राजगुरुनगर शहरातून काळे झेंडे घेऊन बैलगाड्यासह निषेध रॅली काढली होती. संतप्त बैलगाडामालकांनी राज्य सरकारला इशारा दिला. येत्या १५ तारखेपर्यंत राज्यात बैलगाडा शर्यत सुरू करण्याची मागणी केली आहे.
...तर बंदी झुगारून बैलगाडा घाटात पळवू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 08, 2018 3:51 AM