- एस. के.जैन, अध्यक्ष, नियामक मंडळ, शिक्षण प्रसारक मंडळी
-----------
शासनाकडून तसेच स्थानिक प्रशासनाकडून शाळा स्वच्छता व सॅनिटायझर साठी कोणताही निधी प्राप्त झालेला नाही. त्यामुळे मुख्याध्यापक व शिक्षक यांच्याकडून रक्कम जमा करून हा खर्च भागविला जात आहे.आमच्याकडे निधी उपलब्ध नसल्याचे त्यांनी सांगितले. तसेच शहरातील काही शाळा सकाळी व दुपारी अशा दोन सत्रात भारतात. मात्र, इयत्ता पाचवी ते आठवीच्या शाळा सुरू होणार असल्याने शाळा भरविण्यास अडचणी येऊ शकतात. परंतु ,एकूण भौतिक सुविधांचा विचार करून मुख्याध्यापकांनी विद्यार्थ्यांना शाळेत बोलावले.
- हरिश्चंद्र गायकवाड, अध्यक्ष, मुख्याध्यापक संघ,पुणे
----------------
सुमारे आठ महिन्यांपासून शाळा बंद असल्याने त्या चांगल्याच स्वच्छ करावे लागणार आहेत. परंतु, शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे शाळा स्वच्छ करण्यासाठी आवश्यक कर्मचारी शाळेमध्ये उपलब्ध नाहीत. त्यामुळे शाळांमधील चतुर्थ श्रेणी कर्मचा-यांवर कामाचा ताण पडत आहे.
- शिवाजी खांडेकर, सरकार्यवाह शिक्षकेतर कर्मचारी संघटना.