पुणे : प्राथमिक शिक्षण खात्याने ९८ टक्के विद्यार्थ्यांच्या पाठीवर दप्तराचा भार नियमानुसार आहे, असा अहवाल राज्य सरकारला दिला आहे. मात्र, भार कागदावरच कमी झाला असून, प्रत्यक्षात तो वाढल्याचे पालकांचे मत असून, विद्यार्थ्यांच्या पाठीचा कणा मोडलेलाच आहे.स्वत:च्या वजनाच्या निम्म्या वजनाचे दप्तर मुलांना न्यावे लागत असल्याची तक्रार पालक करीत आहेत. शिक्षण विभागाने २३,४४३ शाळांतील ४ लाख १७ हजार ८९३ विद्यार्थ्यांच्या दप्तराची तपासणी केली. त्यात ४ लाख १२ हजार २५२ मुलांच्या दप्तराचे वजन नियमानुसार असल्याचे त्यांना आढळले. त्यामुळे पालक खरे की अधिकारी, असा प्रश्न निर्माण झाला आहे. अधिकाऱ्यांच्या मते ५,१४१ विद्यार्थ्यांच्या दप्तराचे वजन अधिक आहे.>१५ जिल्हे ओझेविरहितनाशिक, नंदूरबार, धुळे, अकोला, वाशिम, यवतमाळ, नागपूर, हिंगोली, जालना, लातूर, मुंबई, पालघर, सांगली, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या १५ जिल्ह्यांतील एकाही विद्यार्थ्याच्या पाठीवर नियमापेक्षा जास्त वजनाचे दप्तर नव्हते.
विद्यार्थ्यांच्या दप्तराचे ओझे कागदावरच कमी, सरकार खरे की अधिकारी?
By ऑनलाइन लोकमत | Published: December 02, 2018 6:35 AM