शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: ७२ खेळाडूंना मिळाला खरेदीदार, ४६७ कोटींची उलाढाल! कोणता खेळाडू कुठल्या संघात? पाहा यादी
2
लाडक्या बहिणींना मिळणाऱ्या ₹1500 चे लवकरच ₹2100 होणार, मुख्यमंत्री शिंदेंची मोठी घोषणा!
3
IPL Auction 2025: डेव्हिड वॉर्नर ते पियुष चावला... 'हे' खेळाडू राहिले UNSOLD! सर्वच संघांनी फिरवली पाठ
4
IPL Auction 2025: पहिल्या दिवसात ७२ खेळाडूंची विक्री, पाहा कोण ठरले Top 10 महागडे शिलेदार
5
TATA IPL Auction 2025 Live: ७२ खेळाडूंचं 'शॉपिंग'; ४६७.९५ कोटींची बोली... पहिल्या दिवशी भारतीय खेळाडूंचा बोलबाला
6
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या मैदानात उतरल्या होत्या 363 महिला, किती जिंकल्या? असा राहिला महायुतीचा स्ट्राइक रेट
7
"प्रिय बंधु-भगिनींनो... सप्रेम नमस्कार..."! देवेंद्र फडणवीस यांचं जनतेला पत्र; सांगितले विजयाचे 4 'खरे शिल्पकार'
8
IPL Auction 2025 : RR च्या नाकावर टिच्चून MI नं खेळला मोठा डाव; ६२ धावांच्या 'त्या' इनिंगमुळे हा खेळाडू रात्रीत 'करोडपती'
9
IPL Auction 2025: तब्बल ५ तासांनी Mumbai Indians ने विकत घेतला पहिला खेळाडू, १२.५० कोटींना कोण आलं संघात?
10
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
11
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
12
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
13
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
14
"सर्वेक्षण करा, जी ज्याची जागा असेल त्याला देऊन टाका..."; संभल जामा मशीद प्रकरणावर काय म्हणाले राकेश टिकैत?
15
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
16
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
17
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
18
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
19
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान

घरफोडी, वाहनचोरी करणारे अटकेत

By admin | Published: May 30, 2017 3:07 AM

रात्रीच्या वेळेस घरफोड्या करणे, वाहन व पेट्रोलचोरी करणे अशा घटनांनी पोलिसांची झोप उडवणाऱ्या सराईत गुन्हेगारांना जेरबंद

लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : रात्रीच्या वेळेस घरफोड्या करणे, वाहन व पेट्रोलचोरी करणे अशा घटनांनी पोलिसांची झोप उडवणाऱ्या सराईत गुन्हेगारांना जेरबंद करण्यात अखेर विश्रामबाग पोलिसांना यश आले आहे. सदाशिव पेठेच्या भागांमध्ये काही दिवसांपूर्वी दिवसा आणि रात्रीच्या वेळी घरफोड्या करून चोरी करण्याचे प्रकार वाढल्याने पोलिसांचे तपाससत्र सुरू होते. सोलापूर येथील सराईत गुन्हेगार मंजुनाथ कृष्णा श्रीराम (वय ३२ रा. मु. पो. कुरुळी सोनवणेवस्ती, ता. हवेली) याला अटक करून त्याच्याकडून १ लाख २७ हजार रूपये किमतीच्या सोन्याचे दागिने व रोख रक्कम हस्तगत करण्यात आली. तसेच वाहनचोर अजय कोंडीबा शेळके (वय २५, रा. मु.पो. सोनेसांगवी, ता. शिरूर) आणि अभिजित नेपेन मंडल (वय २७, रा. शुक्रवार पेठ) या दोघांना अटक करून त्यांच्याकडून एक बुलेटसह १ लाख ६0 हजार रुपये किमतीच्या पाच मोटरसायकली जप्त करण्यात आल्या आहेत, तर सागर पोपट दरेकर (वय २७, रा. १00५ राजेंद्रनगर) याला लोखंडी कोयत्यासह पकडून त्याच्यावर आर्म अ‍ॅक्टप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अपर पोलीस आयुक्त दक्षिण प्रादेशिक विभाग रवींद्र सेनगावकर, परिमंडळ १चे पोलीस उपायुक्त बसवराज तेली, सहायक पोलीस आयुक्त शरद उगले यांच्या मार्गदर्शनाखाली विश्रामबाग पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळासाहेब सुर्वे, पोलीस उपनिरीक्षक साकोरे, पोलीस हवालदार शरद वाकसे, पोलीस नाईक बाबा दांगडे, संजय बनसोडे, सुकदेव रामाणे, चेतन शिरोडकर, सचिन सुपेकर, धीरज पवार, सचिन जगदाळे यांनी ही कामगिरी केली आहे. पुढील तपास विश्रामबाग तपास पथकाचे पोलीस उपनिरीक्षक महेंद्र पाटील करीत आहेत. विश्रामबाग पोलिसांनी एकूण विश्रामबाग पोलीस ठाण्याकडचे ८ गुन्हे, सिंहगड पोलीस स्टेशनकडील १ आणि खेड पोलीस स्टेशनचे १ असे एकूण १0 गुन्हे उघडकीस आणले.