याप्रकरणी दीपक प्रभाकर चौधरी (वय ४०, रा. सोरतापवाडी) यांनी फिर्याद दिली. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दीपक यांच्या आजीची चवथभरणीचा विधी असल्याने घरातील सर्वजण स्वयंपाकघराला कुलूप लावून राहते घरात झोपले होते. पहाटे ५ च्या सुमारास ते नेहमीप्रमाणे सर्वजण जागे झाले. त्या वेळी घराच्या बाहेरून कड्या लावण्यात आलेल्या होत्या. त्यानंतर त्यांनी
शेजारी राहत असलेला भाऊ प्रकाश बबन चौधरी यास आवाज देऊन घराचा दरवाजा उघडण्यास सांगितले. त्यांनी बाहेर येऊन पाहिले असता स्वयंपाकघराच्या दरवाजाचा कोयंडा कोणीतरी तोडलेला दिसला. आत पाहिले असता त्यांना आजीचे कपड्यांचे कपाट उचकटून त्यातील कपडे अस्ताव्यस्त पडलेले दिसले. कपाटाचा आतील कप्पा कशाने तरी उचकटून त्यातील दागिने चोरट्यांनी लंपास केल्याचे आढळले. चोरट्यांनी ९० हजार रुपये किमतीची तीन तोळे वजनाची मोहनमाळ, १० हजार रुपये किमतीची तीन ग्रॅम वजनाची लेडीज अंगठी या सोन्याचे दागिनेसह ७५० रूपये किमतीचे लहान बाळाचे पायातील एक जोडी चांदीचे तोडे, व एक जोडी पैंजण याबरोबरच ३० हजार रुपये रोख रक्कम १ लाख ३० हजार ७०० रुपये किमतीचा ऐवज लंपास केला.