याप्रकरणी पारस रामचंद्र छाजेड (वय ५५, रा. गुरुकृपा बंगला, नंबर ७, मुनलाईट लॉजच्या पाठीमागे, उरुळी देवाची, ता. हवेली ) यांनी फिर्याद दिली. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. छाजेड हे दूध वितरक आहेत. गुरुवारी (दि.१६) रात्री १२.३० च्या सुमारास ते आपल्या कुटुंबीयांसमवेत जेवण करून घराच्या दरवाजाला आतून कडीकोयंडा लावून झोपले. पहाटे ५ वाजण्याच्या सुमारास ते दूध टाकण्याकरिता मंतरवाडी रोड येथे गेले होते.
सकाळी ६.३० च्या सुमारास त्यांना पत्नी भारती हिने फोनद्वारे आपल्या घरामध्ये चोरी झाली असून चोराने बेडरूमधील लाकडी कपटातील पर्समध्ये ठेवलेले सोन्याचे दागिने व पैसे नेले आहेत, असे कळविले. ते तत्काळ घरी आले व पाहणी केली असता त्यांना स्वयंपाक घराची लोखंडी खिडकी तुटलेली दिसली. बेडरूममध्ये पाहणीकरिता लाकडी कपाटामध्ये ठेवलेले पर्स व त्यातील सोन्याचे दागिने व पैशाचा शोध घेतला असता ते मिळून आले नाहीत. त्यामुळे चोरी झाल्याची खात्री झालेने त्यांनी उरूळी देवाची दूरक्षेत्रात जावून तक्रार दिली.