मी आणि माझी दोन मुले घरामध्ये झोपलेलो होतो. शेजारच्या घरात दीर, त्यांची पत्नी आणि त्यांची मुले होती. रात्री धूर येऊ लागल्यानंतर मला जाग आली. त्यानंतर काही वेळातच आमच्याही घराला आग लागली. आम्ही मोलमजुरी करुन जगतो. आमच्या घरातला टीव्ही, कपाट, कपडे, सगळा संसार जळाला. मुलांचे शैक्षणिक साहित्यही जळाले. काय करावे सुचन नाही. पुन्हा सगळे उभे करायचे सोपे नाही.
- सारिका कैलास दुबळे
====
माझे पूर्ण घर जळाले. आम्ही सगळे जीव वाचविण्यासाठी घराबाहेर धावलो. नजरेसमोर घर जळताना पाहून अश्रू थांबत नव्हते. माझा मुलगा कॉलेजला शिकतो. त्याची सर्व पुस्तके आणि साहित्य जळाले. संसारातील काही सुद्धा शिल्लक राहिलेले नाही. भांडी वितळली. धान्य-भाज्या जळून गेल्या. आम्ही आता जगायचे कसे असा प्रश्न आहे.
- समिना अन्वर डफेदार