याबाबत अधिक माहिती अशी की, पेठ गावच्या हद्दीत प्रदीप सोमवंशी (रा. भोसरी) यांच्या कार (क्रमांक एम. एच.१४ ई. वाय.८४५०) च्या डॅशबोर्डवर सूचना आल्यानंतर त्यांनी गाडी बाजूला घेतली. थोडा धूर दिसल्यामुळे त्यांनी बोनेट उघडल्यावर बोनेटमधून जाळ बाहेर येऊ लागला. विझविण्याचा प्रयत्न करण्याआधीच आग आटोक्यात न आल्यामुळे वाहनाने प्रचंड पेट घेतला आणि पाहता-पाहता या आगीत संपूर्ण गाडी जळून खाक झाली. महामार्गावर वाहनाने पेट घेतल्यामुळे काही काळ वाहतूक विस्कळीत झाली. पेठ येथील दिलीप धुमाळ यानी महामार्ग पोलीस आणि मंचर पोलिसांना फोन करून घटनेची कल्पना दिली. याकामी अशोक राक्षे, माजी उपसरपंच अनिल सणस,संजय वाव्हळ यांनी घटनास्थळी वाहतूक सुरळीत करण्यासाठी मदत केली.
१७ मंचर आग