पिंपरी :पिंपरी-चिंचवड शहर औद्योगिकनगरीमधील तळवडे येथील कारखान्यास लागलेल्या आग प्रकरणाचे पडसाद नागपुर अधिवेशनात उमटले. विधानपरिषदेत सोमवारी चर्चा झाली. प्रकरणाची चौकशी करावी, मृतांना मदत द्यावी. वायसीएममध्ये आग घटनेतील रुग्णाच्या उपचारासाठी बर्न वार्ड निर्माण करावा, अशी मागणी करण्यात आली. त्यावर औद्योगिक परिसरात लायसननुसार उदयॊग सुरु आहेत कि नाहीत, याबाबत तपासणी करण्यात येणार आहे. मुख्यमंत्र्याच्या माध्यमातून मदत केली जाणार आहे, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात जाहीर केले.
राज्य विधिमंडळाचे नागपूर येथे हिवाळी अधिवेनश सुरू आहे.शुक्रवारी पिंपरी-चिंचवडमधील तळवडे येथील ज्योतिबानगर येथे फायर कँडल कंपनीमध्ये आग लागली. त्यामध्ये आतापर्यंत ९ कामगारांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. अशा घटना पुन्हा घडू नयेत आणि उपायोजना कराव्यात, याबाबत आमदार उमा खापरे यांनी औचित्याचा मुद्दा विधानपरिषदेत मांडला. त्यावर पीठासन अधिकारी नीलम गोर्हे यांनी परवानगी दिली.
आमदार उमा खापरे, पिंपरी चिंचवड हा औद्योगिक परिसर असून त्या परिसरामध्ये छोटे-मोठे लघु उद्योग सुरू आहेत. पिंपरी चिंचवड शहरामध्ये गेले काही वर्षांपासून आगीच्या घटना मोठ्या प्रमाणावर घडलेल्या आहेत. तळवडे येथील घटना घडली. त्या घटनेच्या अनुषंगाने चौकशी होणार आवश्यक आहे. त्याचबरोबर या प्रकरणाच्या निमित्ताने अनेक गोष्टी पुढे आलेल्या आहेत. त्यामध्ये लायसन्स एका विषयाचं होतं आणि काम दुसऱ्या विषयाचे सुरू होतं. याबाबत औद्योगिक परिसराचा सर्वे व्हायला हवा. त्याचबरोबर मृत्यू झालेल्या व्यक्तींच्या कुटुंबियांना २५ लाख तसेच जखमी असणाऱ्या व्यक्ती ने कुटुंबीयांना दहा लाखांची मदत करावी. त्याचबरोबर पिंपरी- चिंचवड महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयामध्ये बर्नवॉर्ड तयार करावा. मृतांच्या नातेवाईकांना मदत देण्यासाठी शासनाच्या वतीने तातडीने प्रयत्न करावेत. त्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिले.
फडणवीस म्हणाले, औद्योगिक परिसरामध्ये एका गोष्टीचा परवाना घेऊन दुसरे काम सुरू आहे असते. याबाबतचे सर्वेक्षण करण्यात येईल. नियमानुसार कामे सुरू आहेत की नाही हे तपासण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसेच मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून अपघातातील मृत्यू मुखी पडलेले तसेच जखमी असलेल्या व्यक्तींच्या नातेवाईकांना मदत देण्यात येईल.